Pune MHADA Lottery: पुणेकरांसाठी गृहस्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी; ताथवडे येथील 792 म्हाडा घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पिंपरी-चिंचवडमधील मोक्याचे ठिकाण असलेल्या ताथवडे येथे म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 792 सदनिकांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

Pune MHADA Lottery: पुणेकरांसाठी गृहस्वप्नपूर्तीची सुवर्णसंधी; ताथवडे येथील 792 म्हाडा घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Pune MHADA Lottery:  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या अगदी जवळ हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोक्याचे ठिकाण असलेल्या ताथवडे येथे म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 792 सदनिकांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. आज, 27 एप्रिलपासून या घरांसाठी नोंदणी प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला असून, नागरिकांना आता ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.

प्रकल्पाचे महत्त्व आणि स्थान
ताथवडे हे ठिकाण पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग या दोन्ही प्रमुख रस्त्यांना जोडलेले असल्याने गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी अत्यंत सोयीचे आहे. म्हाडाच्या या प्रकल्पाचा हा दुसरा आणि अंतिम टप्पा असून, यापूर्वी पहिल्या टप्प्यातील 600 घरांची विक्री यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

अर्जाचे वेळापत्रक आणि महत्त्वाची माहिती

नोंदणी सुरुवात: 27 एप्रिल 2026 (दुपारी 1:30 पासून)
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 2 जून 2026
पात्र अर्जांची यादी: 30 जून 2026
सोडतीचा निकाल: 8 जुलै 2026 (दुपारी 12:00 वाजता, ऑनलाइन पद्धतीने)

हेही वाचा – Mumbai Accident Marine Drive: मुंबईत पहाटेच घडला थरकाप उडवणारा अपघात; 3 जणांनी गमावला जीव

अनामत रक्कम आणि शुल्क
सोडतीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना खालीलप्रमाणे अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे:

अल्प गट (LIG): 50,000 रुपये
मध्यम गट (MIG): 75,000 रुपये
अर्ज शुल्क: 708 रुपये (विनापरतावा)

या प्रकल्पाचे काम येत्या 4 महिन्यांत पूर्ण होणार असल्याने, विजेत्यांना लवकरच घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे. महामार्गालगत घर घेण्याची ही पुणेकरांसाठी शेवटची आणि मोठी संधी ठरू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number