MPSC Group C Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC कडून ‘गट-क’ च्या 2,619 जागांसाठी मोठी भरती सुरू

पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.<br/>

MPSC Group C Recruitment 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC कडून ‘गट-क’ च्या 2,619 जागांसाठी मोठी भरती सुरू

MPSC Group C Recruitment 2026: MPSC करणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आयोगाने 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026' अंतर्गत तब्बल 2619 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या मेगा भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या विशेष धोरणात्मक निर्णयानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषक उमेदवारांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सप्टेंबरमध्ये ऑनलाईन परीक्षा; उद्योग ते मोटार वाहन निरीक्षकांची पदे भरणार
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांमधील उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, लिपिक-टंकलेखक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षक ही महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत. या सर्व पदांसाठीची संयुक्त पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर रोजी घेतली जाईल. ही परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संपूर्णपणे संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि आरक्षणा संदर्भातील सविस्तर तपशील एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लिपिक संवर्गासाठी सर्वाधिक जागा; जाणून घ्या जागांचा संपूर्ण तपशील
या मेगा भरतीमध्ये सर्वाधिक जागा लिपिक-टंकलेखक या संवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण जागांचे पदनिहाय वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

लिपिक-टंकलेखक: 1864 पदे (सर्वाधिक जागा)
सहायक मोटार वाहन निरीक्षक: 461 पदे
कर सहायक: 282 पदे
उद्योग निरीक्षक: 9 पदे
तांत्रिक सहायक: 3 पदे

हेही वाचा – Aishwarya Rai Song: शिक्षण मंडळाचे चाललेय काय? पाचवीच्या पाठ्यपुस्तकात ऐश्वर्या रायचे गाणे छापल्याने मोठा गदारोळ

सीमाभागातील गावांमधील मराठी तरुणांना विशेष सवलत
10 जुलै 2008 च्या शासन निर्णयाचा दाखला देत आयोगाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्राने दावा केलेल्या बेळगावसह सीमाभागातील एकूण 865 मराठी भाषक गावांमधील पात्र उमेदवारांना या परीक्षेत बसता येईल. मात्र, अशा उमेदवारांना अर्ज भरताना 'अधिवास' (Domicile) संदर्भातील योग्य तो पर्याय निवडणे अनिवार्य राहील. तसेच, अंतिम निवडीनंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळी सक्षम प्राधिकाऱ्याने विहित नमुन्यात दिलेला वास्तव्याचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचनेतील सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचून घेण्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number