जेवणाच्या वादातून सहकाऱ्याची हत्या

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत मोलमजुरी साठी पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्या वरून झालेल्या वादात एकाने  सहकारी कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत बुधवारी रात्री घडली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील  भिवंडीत पिज्यु बर्मन आणि त्याचा मित्र हे दोघे भिवंडीत मोलमजुरी करण्यासाठी वंजारपट्टी येथील एका कारखान्यात कामाला होते. त्याच ठिकाणी वास्तव्यास होते. […]

जेवणाच्या वादातून सहकाऱ्याची हत्या

भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत मोलमजुरी साठी पश्चिम बंगाल राज्यातून आलेल्या दोघा कामगारांमध्ये जेवण बनविण्या वरून झालेल्या वादात एकाने  सहकारी कामगाराची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना भिवंडीत बुधवारी रात्री घडली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील  भिवंडीत पिज्यु बर्मन आणि त्याचा मित्र हे दोघे भिवंडीत मोलमजुरी करण्यासाठी वंजारपट्टी येथील एका कारखान्यात कामाला होते. त्याच ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या कडे दीपक बर्मन हा नव्याने कामाच्या शोधात आल्यानंतर त्याला ही त्यांनी आपल्या सोबत ठेवून घेत कामा वर लावले.

दरम्यान, रात्री काम उरकल्यावर पिज्यु याने दीपक यास जेवण बनविण्यास सांगितले. दीपक याने आपणास जेवण बनवीता येत नसल्याचे सांगत जेवण बनविण्यास नकार दिला. यावरून पिज्यु आणि दीपक यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारी झाली. राग अनावर झालेल्या पिज्यु याने दगड घेऊन दीपक याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर माहिती मिळताच निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळा वरून फरार होऊन पसार होण्याच्या तयारीत लपून बसलेल्या पिज्युच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number