Kharghar Coastal Road: 45 मिनिटांचा प्रवास आता 10 मिनिटांत! खारघर कोस्टल रोडमुळे वाचणार नवी मुंबईकरांचा वेळ

पनवेलच्या खाडीकिनारी उभारल्या जाणाऱ्या 'खारघर कोस्टल रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आता खारघर ते बेलापूर दरम्यानचा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.<br/>

Kharghar Coastal Road: 45 मिनिटांचा प्रवास आता 10 मिनिटांत! खारघर कोस्टल रोडमुळे वाचणार नवी मुंबईकरांचा वेळ

Kharghar Coastal Road: प्रवाशांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास वेगवान करण्यासाठी सिडकोने आता कंबर कसली आहे. पनवेलच्या खाडीकिनारी उभारल्या जाणाऱ्या 'खारघर कोस्टल रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आता खारघर ते बेलापूर दरम्यानचा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि गुंतवणूक
सुमारे 9.67 किमी लांबीच्या या सागरी मार्गासाठी 1020.70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग 6 पदरी असून त्याचे काम सध्या दोन टप्प्यांत वेगाने सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यात खारघर ते सीबीडी बेलापूर आणि दुसऱ्या टप्प्यात सीबीडी बेलापूर ते नेरूळ जेट्टी अशा कामांचा समावेश आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि कनेक्टिव्हिटी
हा मार्ग केवळ शहरांतर्गत प्रवासासाठी मर्यादित नसून, तो मुंबई आणि नवी मुंबईतील दळणवळणाची समीकरणे बदलणारा ठरेल. हा कोस्टल रोड थेट नवी मुंबई विमानतळाला जोडला जाणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच, हा रस्ता शीव-पनवेल महामार्ग आणि नेरूळमधील पाम बीच रोडला जोडला जाईल, ज्यामुळे मुंबईतील पूर्व उपनगरांतून येणाऱ्या प्रवाशांना थेट विमानतळापर्यंत पोहोचणे सोपे होईल. याशिवाय खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि गृहनिर्माण प्रकल्पांनाही या मार्गाचा मोठा लाभ मिळेल. भविष्यात हा मार्ग 'अटल सेतू'ला (MTHL) जोडण्याचा सिडकोचा मानस असून, यामुळे पुणे आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक सुधारेल.

पर्यावरणाची काळजी आणि प्रकल्पाची व्याप्ती
प्रकल्पाची आखणी करताना खारफुटी आणि खाडी परिसराचे नुकसान टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने मार्गाचा काही भाग जमिनीच्या बाजूने वळवण्यात आला आहे. हा मार्ग खारघरमधील सेक्टर 16 पासून सुरू होऊन सीबीडी बेलापूरमधील सेक्टर 15 मार्गे नेरूळमधील डीपीएस स्कूलपर्यंत जाणार आहे.

हेही वाचा –  Lake Fish Death: पाषाण तलावात मृत माशांचा खच, PMC आयुक्तांचा मोठा दणका; चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड

डेडलाईन आणि भविष्यातील परिणाम
सिडकोने हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या मार्गामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर नवी मुंबईच्या रिअल इस्टेट आणि व्यावसायिक क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number