Pune Railway: 8 स्थानकं अन् 11 मशिन्स…पुणे रेल्वे विभागाच्या ‘या’ प्लॅनने गुन्हेगारांचे धाबे दणाणणार

कोल्हापूर, दौंड, मिरज, हडपसर, खडकी, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रत्येकी 1 मशिन बसवण्यात येणार आहे.<br/>

Pune Railway: 8 स्थानकं अन् 11 मशिन्स…पुणे रेल्वे विभागाच्या ‘या’ प्लॅनने गुन्हेगारांचे धाबे दणाणणार

Pune Railway: रेल्वेतून होणारी मालवाहतूक अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी पुणे रेल्वे विभागाने कंबर कसली आहे. विभागातर्फे आता प्रत्येक पार्सलची कसून तपासणी केली जाणार असून, यासाठी महत्त्वाच्या 8 स्थानकांवर 11 अत्याधुनिक पार्सल स्कॅनर मशिन बसवण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. यामुळे बंद पॅकिंगमधील पार्सलमधून होणाऱ्या कोणत्याही धोकादायक किंवा बेकायदेशीर वस्तूंच्या वाहतुकीला चाप बसणार आहे.

पुणे स्थानकावर सर्वाधिक स्कॅनर्स

पुणे रेल्वे विभाग हा मध्य रेल्वेचा महसूल मिळवून देणारा प्रमुख विभाग आहे. गेल्या वर्षी केवळ पार्सल सेवेतून पुणे विभागाला 21 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. वाढत्या मालवाहतुकीसोबतच सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. ही गरज ओळखून सर्वाधिक वर्दळ असलेल्या पुणे रेल्वे स्थानकावर 4 स्कॅनिंग मशिन तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय कोल्हापूर, दौंड, मिरज, हडपसर, खडकी, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रत्येकी 1 मशिन बसवण्यात येणार आहे.

हेही वाचा – Pune Nagpur Trains News : प्रवाशांनो लक्ष द्या! पुणे-नागपूर मार्गावर रेल्वेचा 22 दिवस 'मेगाब्लॉक'; जाणून घ्या, पर्यायी व्यवस्था

पॅकिंगमधील 'छुपे' धोके आता ओळखा येणार

रेल्वेच्या पार्सल सेवेतून फळे, भाज्या, दुचाकी, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते औद्योगिक उत्पादनांपर्यंत अनेक गोष्टी पाठवल्या जातात. आजवर ही पार्सल बंद स्वरूपात असल्याने त्यामध्ये नेमकी कोणती वस्तू आहे, याची तांत्रिक तपासणी करणे रेल्वे प्रशासनाला कठीण जात होते. मात्र, नवीन स्कॅनिंग प्रणालीमुळे आता प्रत्येक पार्सलमध्ये काय आहे, हे स्कॅनरच्या सहाय्याने स्पष्ट दिसणार आहे. यामुळे ज्वलनशील पदार्थ, शस्त्रे किंवा इतर धोकादायक वस्तूंची वाहतूक रोखणे रेल्वेला शक्य होईल.

हेही वाचा – Pune Municipal Elections: निवडणुकांच्या रणधुमाळीत पुणेरी टोला; ‘धर्म नको, विकासावर बोला’ असा नेत्यांना थेट संदेश

प्रवाशांची सुरक्षितता आमची प्राथमिकता

पुणे विभागातील एकूण 83 स्थानकांवरून दररोज सुमारे 1.75 लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेचे रक्षण या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या मशिनरी उपलब्ध झाल्यामुळे पार्सल सेवेतील पारदर्शकता वाढेल आणि संभाव्य धोके वेळेतच टळतील, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number