Western Railway Anti Encroachment: गोरेगाव-मालाड दरम्यान 60 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; हायकोर्टाच्या आदेशानंतर हार्बर लाईनच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

वांद्रे पूर्व येथील गरीबनगरमधील यशस्वी कारवाईनंतर, आता रेल्वे प्रशासनाने आपला मोर्चा गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान वळवला आहे.

Western Railway Anti Encroachment: गोरेगाव-मालाड दरम्यान 60 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; हायकोर्टाच्या आदेशानंतर हार्बर लाईनच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

Western Railway Anti Encroachment: मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. वांद्रे पूर्व येथील गरीबनगरमधील यशस्वी कारवाईनंतर, आता रेल्वे प्रशासनाने आपला मोर्चा गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान वळवला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत, पश्चिम रेल्वेने रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर थेट हातोडा चालवला आहे.

60 बांधकामे उद्ध्वस्त 
गोरेगाव आणि मालाड स्थानकांच्या पूर्व बाजूला रेल्वेच्या हक्काच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वस्त्या आणि व्यावसायिक बांधकामे उभी राहिली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट उपस्थितीत आणि कडक पोलीस बंदोबस्तात ही धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 36 पक्की घरे व दुकाने आणि 24 तात्पुरती बांधकामे बुलडोझरच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या धडक कारवाईमुळे रेल्वेच्या मालकीची सुमारे 1500 चौरस मीटर मोक्याची जागा अतिक्रमणातून पूर्णपणे मुक्त करण्यात आली आहे.

हार्बर लाईनच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा 
या बेधडक कारवाईमागे केवळ अतिक्रमण हटवणे हा हेतू नसून, मुंबईकरांच्या हक्काच्या रेल्वे प्रकल्पांचा वेग वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. मोकळी करण्यात आलेली ही सर्व जागा रेल्वे प्रशासनाकडून हार्बर लाईनच्या पुढील विस्तारीकरणासाठी वापरली जाणार आहे. गोरेगाव ते मालाड दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार झाल्यामुळे पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार असून, या मार्गावर लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यास मोठी मदत होईल.

हेही वाचा – Central Railway: मुंबईकरांनो लक्ष द्या! CSMT पुनर्विकासामुळे रेल्वे वाहतुकीत मोठा बदल, पुढील 10 दिवस ‘या’ गाड्या सीएसएमटीपर्यंत जाणार नाहीत

रेल्वे प्रशासनाचा इशारा; भविष्यातही मोहिमेचे सत्र सुरूच राहणार
रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रेल्वेचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे जमिनीवरील अतिक्रमणांविरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच आक्रमकपणे सुरू राहणार आहे. यामुळे भविष्यात रेल्वेच्या जमिनीवर पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number