Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय; सिंचन योजना, नदी पुनरुज्जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी घोषणांचा पाऊस

1 एप्रिल रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा, महसूल आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित सहा ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.<br/>

Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय; सिंचन योजना, नदी पुनरुज्जीवन आणि विद्यार्थ्यांसाठी घोषणांचा पाऊस

Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक शेतकरी, विद्यार्थी आणि दिव्यांगांसाठी अत्यंत फलदायी ठरली आहे. 1 एप्रिल रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा, महसूल आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित सहा ऐतिहासिक निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय:
1. साकळाई उपसा सिंचन योजनेला गती अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. यामुळे 32 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून 9600 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

2. नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्राधिकरण राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी 'महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 54 प्रदूषित पट्ट्यांमध्ये विशेष पुनरुज्जीवन प्रकल्प राबवले जातील.

3. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ राज्यातील आठवी ते बारावीपर्यंतच्या हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 12 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

4. भूमि अभिलेख विभागात पदोन्नतीची संधी भूमि अभिलेख विभागातील 'भूकरमापक' हे पद आता 'परिरक्षण भूमापक' म्हणून ओळखले जाईल. हे पद आता पदोन्नती आणि विभागीय भरतीद्वारे भरले जाणार असल्याने या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

5. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समिती अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत आलेल्या विविध निवेदनांचा आणि अर्जांचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Agricultural Mechanization Scheme: बळीराजासाठी खुशखबर! कृषी यांत्रिकीकरण योजनेला 700 कोटींचा निधी मंजूर, पाहा शासन निर्णय

6. अमरावतीत भव्य क्रीडा संकुल अमरावती महापालिकेच्या हद्दीतील मौजे नवसारी येथील 16,708 चौ.मी. जागा क्रीडा संकुलासाठी देण्यास महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध होणार आहे. आजच्या बैठकीने शेती, शिक्षण आणि पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांना स्पर्श केला आहे. विशेषतः साकळाई योजनेच्या निधीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना मोठा आधार मिळणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number