जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. पवार यांनी आज 77 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. तब्बल 37 वर्षांनंतर जन्मदिनी शरद पवार उतरणार रस्त्यावर आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांनी काढलेला हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे.
या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझाद करण्यात आहेत… दोन्ही पक्षांच्या पदाधिऱ्यांनी नागपुरात मोर्चाचं नियोजन केलंय… काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमीहून तर राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे कॉलेजपासून निघणाराय… यानंतर दोन्ही मोर्चे लोकमत चौकात एकत्र येणार आहेत.
पवारांनी आधीच राजकारणात 50 वर्ष पूर्ण केली आहेत. या राजकीय प्रवासात शरद पवारांनी महाराष्ट्र आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदं भूषणली आहेत.