Ashok Kharat Case: भोंदू खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; ‘या’ पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक

खरातच्या अवैध कमाईला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली सिन्नरमधील पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Ashok Kharat Case: भोंदू खरातचे 32 बेनामी बँक व्यवहार उघड; ‘या’ पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक

Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर आता आर्थिक गुन्हे शाखेने आपला फास अधिक आवळला आहे. खरातच्या अवैध कमाईला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे खरातच्या गुन्हेगारी रॅकेटमधील आर्थिक लागेबांधे समोर आले असून, तपासात मोठी प्रगती झाली आहे.

बनावट खात्यांतून कोट्यवधींची 'माया' पांढरी करण्याचा प्रयत्न?
अशोक खरातने केवळ लैंगिक शोषण आणि भोंदूगिरीच केली नाही, तर फसवणुकीतून कमावलेला पैसा लपवण्यासाठी बँकिंग यंत्रणेचा अत्यंत खुबीने वापर केल्याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेत खरातशी संबंधित तब्बल 32 संशयास्पद खाती सापडली आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) दाव्यानुसार, ही सर्व खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आली होती. या खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मोठा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

मॅनेजरचे सहकार्य आणि पोलिसांची ॲक्शन
पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर याने सर्व बँकिंग नियम धाब्यावर बसवून खरातला ही खाती उघडण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकरणी सिन्नर पोलिसांनी कांडेकरला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यवस्थापकाच्या अटकेमुळे आता या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे नेमके कोठपर्यंत पसरले आहेत, याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा – Thane Crime: ‘मरशील’ म्हणत भीती दाखवली, अघोरी पूजेच्या नावाखाली लुटलं! ‘कॅसिनो बाबा’चा थरारक खेळ उघड

आता 'मोठे मासे' गळाला लागणार?
दरम्यान, आता या 32 खात्यांमधील प्रत्येक पैशाचा तांत्रिक हिशोब तपासला जात आहे. या खात्यांमधील पैसा नक्की कोणाला वळवण्यात आला, बनावट कागदपत्रांसाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि पतसंस्थेचे इतर पदाधिकारी या कटात सामील आहेत का, या दिशेने आता तपास सुरू आहे. या प्रश्नांच्या उत्तरांतून लवकरच या आर्थिक रॅकेटमधील आणखी काही बड्या व्यक्तींची आणि गुन्हेगारांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number