Food Poisoning : पालक-चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; पौष्टिक आहार ‘विष’ कसा बनतो? नेमकं काय आहे कारण?

इटाप गावातील या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात चिकन आणि पालकाचा बेत केला होता. जेवणानंतर काही वेळातच तिघांची प्रकृती खालावली आणि..

Food Poisoning : पालक-चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; पौष्टिक आहार ‘विष’ कसा बनतो?  नेमकं काय आहे कारण?

Food Poisoning : ओडिशाच्या ढेंकानाल जिल्ह्यातील इटाप गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चिकन करी आणि पालकाची भाजी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 सदस्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सकस आहार म्हणून ओळखले जाणारे चिकन आणि पालक जीवावर बेतू शकतात, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. मात्र, खाण्यापिण्याच्या बाबतीत केलेल्या 5 गंभीर चुका अन्नाला विष (Food Bacterial Infection) बनवू शकतात.

नेमकी घटना काय?
इटाप गावातील या कुटुंबाने रात्रीच्या जेवणात चिकन आणि पालकाचा बेत केला होता. जेवणानंतर काही वेळातच तिघांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या मृत्यूचे प्राथमिक कारण 'फूड पॉयझनिंग' असल्याचे सांगण्यात येत असून, पोलीस आणि आरोग्य विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चिकन आणि पालकातील छुपे धोके
अन्नामुळे होणारे संक्रमण अनेकदा जीवघेणे ठरते. जाणून घेऊ कसे :
चिकनचा धोका: कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या चिकनमध्ये 'साल्मोनेला' आणि 'कॅम्पिलोबॅक्टर' सारखे धोकादायक बॅक्टेरिया असतात. चिकन योग्य तापमानावर (किमान 75°C) शिजवले नाही, तर हे जंतू शरीरात जाऊन अवयव निकामी करू शकतात.
पालक आणि पालेभाज्या: पालेभाज्या अनेकदा माती किंवा दूषित पाण्याच्या संपर्कात येतात. त्यात 'ई. कोलाई' आणि 'लिस्टेरिया' सारखे जिवाणू असू शकतात. केवळ वरवर पाणी मारल्याने हे जंतू नष्ट होत नाहीत, ज्यामुळे संसर्ग पसरतो.

हेही वाचा – Dal Cooking Tips: डाळ शिजवताना पांढरा फेस येतो; तो काढावा की राहू द्यावा? जाणून घ्या

'क्रॉस-कंटॅमिनेशन': सर्वात मोठी चूक
जेव्हा चिकन आणि पालक एकाच वेळी बनवले जातात, तेव्हा धोका सर्वाधिक असतो. ज्या सुरीने किंवा चॉपिंग बोर्डवर कच्चे चिकन कापले जाते, त्याच साधनांचा वापर पालकासाठी केल्यास चिकनमधील बॅक्टेरिया भाज्यांमध्ये प्रवेश करतात. यालाच 'क्रॉस-कंटॅमिनेशन' म्हणतात. याशिवाय, शिजवलेले अन्न बराच वेळ बाहेर ठेवणे किंवा ते वारंवार गरम करणे हे देखील बॅक्टेरियाच्या वाढीस कारणीभूत ठरते.

लक्षणे दिसताच सावध व्हा
फूड पॉयझनिंगची सुरुवात उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि तापाने होते. अनेकांना ही लक्षणे किरकोळ वाटतात, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन (Dehydration) रुग्ण 'शॉक'मध्ये जाऊ शकतो. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यासाठी हा संसर्ग काही तासांतच जीवघेणा ठरू शकतो.

हेही वाचा – Cold-Cough Home remdies: खोकला गेल्यानंतरही छातीत जडपणा वाटतोय? ही छोटीशी वस्तू तुमच्यासाठी ठरेल वरदान

सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
– मांसाहार आणि पालेभाज्या चिरण्यासाठी नेहमी वेगवेगळे चाकू आणि बोर्ड वापरा.
– हिरव्या पालेभाज्या वाहत्या पाण्याखाली नीट चोळून धुवा; खराब झालेली पाने फेकून द्या.
– मांस हाताळल्यानंतर हात, भांडी आणि किचनचा ओटा साबणाने स्वच्छ धुवा.
– शिजवलेले अन्न उरले असेल तर ते त्वरित फ्रिजमध्ये ठेवा.
– तीव्र पोटदुखी किंवा उलट्या होत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांशी संपर्क साधा.

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. ही कोणत्याची उपचाराचा पर्याय असू शकत नाही. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही किंवा दावा करत नाही. आरोग्याविषयी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number