काँग्रेस जिंकलेल्या जागांवर मतटक्का जास्त घसरला

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचाही समावेश आहे. देशातील १०२ मतदारसंघांमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाले. काँग्रेस जिंकलेल्या जागांवर मतटक्का जास्त घसरला. ज्या १०२ जागांवर मतदान झाले त्यापैकी १५ जागांवर काँग्रेसचा आणि ४० जागांवर भाजपाचा विजय झाला होता. आकडेवारीनुसार […]

काँग्रेस जिंकलेल्या जागांवर मतटक्का जास्त घसरला

नवी दिल्ली, १९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांचाही समावेश आहे. देशातील १०२ मतदारसंघांमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाले. काँग्रेस जिंकलेल्या जागांवर मतटक्का जास्त घसरला.

ज्या १०२ जागांवर मतदान झाले त्यापैकी १५ जागांवर काँग्रेसचा आणि ४० जागांवर भाजपाचा विजय झाला होता. आकडेवारीनुसार भाजपाने जिंकलेल्या ४० जागांवर २०१९ च्या तुलनेत यावेळी ९ टक्के कमी मतदान झाले. तसेच काँग्रेसने जिंकलेल्या १५ जागांवर २०१९ च्या तुलनेत यावेळी १० टक्के कमी मतदान झाले. लोकसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांपैकी ६ कोटी १२ लाख जणांनी मतदानाचा हक्कच बजावला नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ च्या तुलनेत कमी मतदान
देशातील ६ कोटी १२ लाख लोकांनी मतदान टाळले
पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघांची आकडेवारी आली समोर
काँग्रेसने जिंकलेल्या जागांवर मतटक्का जास्त घसरला
भाजपाने जिंकलेल्या ४० जागांवर ९ टक्के कमी मतदान
काँग्रेसने जिंकलेल्या १५ जागांवर १० टक्के कमी मतदान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number