मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी निकाल गुरुवार १५ फेब्रुवारीला येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य खासदार आणि आमदार कोणासोबत आहेत हे तपासून त्यांचा निकाल दिला. राष्ट्रवादी अजित पवारांचीच असा निकाल निवडणूक आयोगाने दिला. यानंतर पवारांच्या गटाला राशप अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आता गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या प्रकरणात निकाल देण्याची शक्यता आहे. हा निकाल पवारांच्या विरोधात आणि अजित पवारांच्या बाजूने जाणार की काही वेगळे होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.