यंदा ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार ३१ जानेवारी ते शुक्रवार ९ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या अधिवेशनात गुरुवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प एप्रिल ते जुलै २०२४ या काळासाठी असेल. लोकसभेसाठी लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे फक्त चार महिन्यांचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. निवडणुकीनंतर […]

यंदा ‘या’ दिवशी सादर होणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार ३१ जानेवारी ते शुक्रवार ९ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या अधिवेशनात गुरुवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा हंगामी अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प एप्रिल ते जुलै २०२४ या काळासाठी असेल. लोकसभेसाठी लवकरच निवडणूक होणार असल्यामुळे फक्त चार महिन्यांचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. निवडणुकीनंतर स्थापन होणारे नवे सरकार पुढील आठ महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प जून – जुलै दरम्यान सादर करेल.

प्रथेप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार आहे. संसदेच्या संयुक्त सभेपुढे बुधवार ३१ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील. नव्या संसदेच्या इमारतीत लोकसभेच्या सभागृहात संयुक्त सभा भरेल. यात लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार उपस्थित असतील. यानंतर गुरुवार १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार
अर्थसंकल्प गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सादर होणार
अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number