मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी सुरू केलेल्या अहिंसक आंदोलनाला हिंसक वळण लागले. राज्यात ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळ, दगडफेक अशा स्वरुपाच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्ही फूटेज यांच्या मदतीने तपास करून अनेकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. आता पुढील पंधरा दिवसांत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.