शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. बराच वेळ झालेल्या या बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत स्पष्टता नसताना शरद पवार यांनी मात्र यावर भाष्य केले आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली. याबाबत अवघ्या दोन वाक्यात शरद पवार यांनी पुण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे. “महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांनी एका विचाराने चालावं, काम करावं” अशी या भेटीमध्ये चर्चा झाली असं शरद पवार म्हणालेत.
खरंतर महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समवेत संजय राऊत हे देखील होते.
तर महाविकास आघाडी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता उद्धव ठाकरे थेट मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहेत. मात्र, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन महाविकास आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर टीका केली होती.