Vaibhav Suryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची थेट टीम इंडियात एन्ट्री? आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी नावावर चर्चा

आयपीएलमधील त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याला थेट भारतीय संघात (Team India) स्थान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Vaibhav Suryavanshi: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची थेट टीम इंडियात एन्ट्री? आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी नावावर चर्चा

Vaibhav Suryavanshi: आयपीएल 2026 च्या हंगामात धावांचा पाऊस पाडणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट जगतात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आयपीएलमधील त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याला थेट भारतीय संघात (Team India) स्थान देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारत आगामी काळात आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळणार असून, या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या संघात वैभवचा समावेश करावा अशी मागणी क्रिकेट वर्तुळातून जोर धरू लागली आहे.

वयाचा निकष की निवड समितीची उत्सुकता?
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवला इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर उतरवणे योग्य ठरेल की नाही, यावरून सध्या मतमतांतरे सुरू आहेत. एका बाजूला त्याच्या वयाचा विचार करून घाई न करण्याचा सल्ला दिला जात असताना, दुसरीकडे प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार निवड समिती मात्र त्याला संघात संधी देण्यासाठी कमालीची उत्सुक आहे. त्यामुळे आगामी टी-20 मालिकेत वैभवला निळ्या जर्सीमध्ये पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांचे वेळापत्रक आणि नेतृत्वात बदल
भारतीय संघ आपल्या आयर्लंड दौऱ्यात 2 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून, या दौऱ्याची सुरुवात 26 जून (शुक्रवार) रोजी पहिल्या सामन्याने होईल, तर दुसरा सामना 28 जून (रविवार) रोजी खेळवला जाईल. विशेष म्हणजे या मालिकेत भारताला नवीन कर्णधार मिळण्याची शक्यता आहे, कारण विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादवला या जबाबदारीतून विश्रांती दिली जाऊ शकते. या दौऱ्यानंतर, 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. आता वैभवची निवड केवळ आयर्लंड दौऱ्यासाठी होते की त्याला इंग्लंडविरुद्धही खेळण्याची संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा – Virat Kohali: अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'या' कारणामुळे विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर

IPL 2026 मध्ये ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढणारा 'ऑरेंज कॅप' विजेता
राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात 16 सामन्यांमधील 16 डावांमध्ये तब्बल 776 धावा कुटल्या. यादरम्यान त्याने 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या तुफानी स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली. या कामगिरीसह आयपीएलच्या इतिहासात 'ऑरेंज कॅप' जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. एवढेच नव्हे, तर या हंगामात तब्बल 72 षटकार ठोकून त्याने दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ऐतिहासिक विक्रमही मोडीत काढला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number