Pune Bengaluru Green Expressway: 14 तासांचा प्रवास आता कमी होणार; पुणे-बंगळुरू ‘ग्रीनफील्ड’ हायवेला लवकरच ग्रीन सिग्नल

सध्याच्या मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (NH-48) वाहतूक कोंडी आणि अपघातांतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मार्च अखेरपर्यंत अंतिम मंजुरी देण्याची शक्यता आहे.<br/>

Pune Bengaluru Green Expressway: 14 तासांचा प्रवास आता कमी होणार; पुणे-बंगळुरू ‘ग्रीनफील्ड’ हायवेला लवकरच ग्रीन सिग्नल

Pune Bengaluru Green Expressway: महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या 'पुणे-बेंगळुरू ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे' प्रकल्पाच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्याच्या मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (NH-48) वाहतूक कोंडी आणि अपघातांतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मार्च अखेरपर्यंत अंतिम मंजुरी देण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
हा प्रकल्प केंद्र सरकारच्या 'भारतमाला' योजनेतील 25 महत्त्वाच्या हरित मार्गांपैकी एक आहे. या हायवेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

वेळेची मोठी बचत: सध्या पुणे ते बेंगळुरू प्रवासासाठी 14 ते 15 तास लागतात. नवा मार्ग हा वेळ थेट 7 तासांवर आणणार आहे.
विशाल संरचना: सुमारे 700 किलोमीटर लांबीचा हा मार्ग 6 ते 8 पदरी (Lanes) असेल.
गुंतवणूक: या प्रकल्पासाठी सुमारे 45 ते 50 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यासाठी 20 हजार एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

हेही वाचा – Pune Traffic : चाकण-तळेगावची वाहतूक कोंडी होणार इतिहासजमा; MIDC चा 50 कोटींचा गेमचेंजर प्लॅन अंतिम टप्प्यात

कुठून जाणार हा महामार्ग?
हा नवा 'ग्रीनफील्ड' मार्ग सध्याच्या हायवेपेक्षा वेगळ्या पट्ट्यातून जाणार आहे. महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांतून हा मार्ग कर्नाटकात प्रवेश करेल. त्यानंतर बेळगावी, बागलकोट, गदग, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग आणि तुमकुरू मार्गे तो थेट बेंगळुरूपर्यंत पोहचेल. विशेष म्हणजे, पुण्याचा प्रस्तावित रिंग रोड (कांजळे-खोपेगाव) या एक्स्प्रेसवेला जोडला जाणार असल्याने मुंबई-पुणे-बेंगळुरू हा औद्योगिक कॉरिडॉर अधिक वेगवान होईल.

लवकरच भूसंपादन सुरू होणार
NHAI चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (DPR) केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. या नवीन मार्गामुळे जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. केवळ वेळच नाही, तर इंधनाची बचत आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या 'ग्रीनफील्ड' प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number