लिलाव बंद, फटका शेतकऱ्यांना

येवला, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद आहे. व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद झाल्यानं गेल्या आठवड्याभरापासून बाजार समित्या बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना बसत आहे. हमाली, तोलाईवरुन कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळं लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय […]

लिलाव बंद, फटका शेतकऱ्यांना

येवला, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद आहे. व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद झाल्यानं गेल्या आठवड्याभरापासून बाजार समित्या बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना बसत आहे.

हमाली, तोलाईवरुन कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळं लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळं आठवड्याभरापासून लासलगाव, नांदगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा, धान्य लिलाव बेमुदत बंद आहे. यामुळं बाजार समित्यांत शुकशुकाट पसरला. अगोदरच मार्च अखेरीसचा काळ हिशोबसाठी चार दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समित्या गुरुवारपासून सुरू होणार होत्या. मात्र, व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळं बेमुदत लिलाव बंद राहणार असल्यानं याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे.

काय आहे प्रकरण ?

हमाली, तोलाई कपातीवरुन कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यात पंधरा दिवसांपासून वाद
तोडगा निघत नाही, तोपर्यंत लिलावात बंद, व्यापाऱ्यांची भूमिका
मनमाड, नांदगाव, येवला, लासलगावसह जिल्हाभरातील बाजार समित्या बंद
बाजार समित्या बंद, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लासलगाव, नांदगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा लिलाव मोट्या प्रमाणात होत असतो त्यामुळे याचा सर्वाधिक फटका कांदा व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. बाजार समितीच्या माहितीनुसार मुळात शेतकरी व बाजार समिती यांचा या बंदशी काडीमात्र संबंध नाही. मुळात गेल्या पंधरा दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता. मात्र प्रशासकीय यंत्रणेनं याकडे दुर्लक्ष केल्यानं व्यापारी असोसिएशननं टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे परिणामी बाजार समित्या बंद आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number