“मेट्रोबाबत बोलताना माहिती घेऊन बोला”

नुकताच मेट्रो ६ कारशेडला ग्रीन सिंग्नल मिळाला असून त्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आपले मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावर भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे यांचावर पलटवार केला आहे. काय म्हणाले उपाध्ये पाहुयात… केशव […]

“मेट्रोबाबत बोलताना माहिती घेऊन बोला”

नुकताच मेट्रो ६ कारशेडला ग्रीन सिंग्नल मिळाला असून त्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आपले मत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यावर भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे यांचावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले उपाध्ये पाहुयात…

केशव उपाध्ये म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मेट्रो संधर्भात अभ्यास करूनच बोलावे. आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य दिशाभूल करणारी आहे. उद्धव ठाकरे यांचा हट्टामुळे मेट्रो चा खर्च २० हजार कोटींचा वाढला असून सर्व सामान्य लोकांना मेट्रो ही आवाक्या बाहेर गेली आहे. आदित्य ठाकरे यांनी तांत्रिकदृष्ट्या माहिती घेत घेतली असती तर मुंबईकरांची दिशाभूल करावी लागले नसती.

आदित्य ठाकरे यांचा सरकारला प्रश्न ?

उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो-६ साठीच्या कारशेडसाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कांजूरमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो-६ कारशेडसाठी दिली जाणार आहे. पण याच मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला. कांजूरमार्गच्या जागेतील 15 हेक्टर जागा मेट्रो 6 साठी देणार आहेत. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number