ICC ODI Rankings: विराट कोहली की रोहित शर्मा? ICC वनडे रँकिंगमध्ये कोण आहे अव्वल?

सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. <br/>

ICC ODI Rankings: विराट कोहली की रोहित शर्मा? ICC वनडे रँकिंगमध्ये कोण आहे अव्वल?

ICC ODI Rankings: भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील अव्वल स्थानासाठीची स्पर्धा पुन्हा एकदा चांगलीच रंगली आहे. कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही फलंदाजांचे लक्ष्य आता एकदिवसीय क्रिकेटवर केंद्रीत झाले असून 2027 च्या विश्वचषकात दोघेही खेळू इच्छितात. सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.  

विराट कोहलीचा धडाका कायम

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत असाधारण कामगिरी केली आहे. मालिकेतील दोन सामन्यांत त्याने सलग दोन शतके झळकावून एकूण 237 धावा केल्या आणि मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही त्याने 74 धावांची महत्त्वाची खेळी केली होती. ताज्या आयसीसी रँकिंगनुसार तो 751 पॉइंट्ससह चौथ्या स्थानावर आहे. जोरदार फॉर्ममुळे त्याने रँकिंगमध्ये एक स्थान वर झेप घेतली आहे.

हेही वाचा – Hardik Pandya: हार्दिक पांड्यामुळे तडकाफडकी बदलावं लागलं स्टेडियम; नेमकं काय झालं?

रोहित शर्मा अजूनही नंबर 1

दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माची खेळीही तितकीच ताकदीची दिसून आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक सामन्यात त्याने 121 धावांचे शतक ठोकले, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात त्याने 57 धावा केल्या. या दमदार कामगिरीवर आधारित रोहित शर्मा सध्या 783 पॉइंट्ससह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे.

हेही वाचा – India vs South Africa:किंग कोहली आणि ऋतुराजची धडाकेबाज शतके! 358 धावा करूनही भारताच्या हाती निराशा; अखेरच्या चेंडूंवर दक्षिण आफ्रिकेची कमाल

दोघांमध्ये कोण आघाडीवर? 

सध्या रोहित रँकिंगमध्ये कोहलीपेक्षा वर आहे. मात्र कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता, दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर त्याच्या रँकिंगमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या नंबर 1 चा मुकुट रोहितकडे असला तरी विराटच्या सलग शतकांमुळे रँकिंगमध्ये उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही रेस आता अधिक रोमांचक बनली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number