Vat Pornima Special Look : उकाडा असो की पावसाळा, कुठल्याही वातावरणात सुखावणारी ‘मलमल लोटस कॉटन साडी’; या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करा

यंदाच्या वटपौर्णिमेला कम्फर्ट आणि पारंपरिक लुकचा उत्तम मेळ घालणारी सुंदर साडी नक्की ट्राय करा. पेस्टल रंगांच्या साड्यांना ऑफिसला जाणाऱ्या महिलांची पहिली पसंती मिळत आहे.

Vat Pornima Special Look : उकाडा असो की पावसाळा, कुठल्याही वातावरणात सुखावणारी ‘मलमल लोटस कॉटन साडी’; या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करा

Vat Pornima Saree Trends : वटपौर्णिमा हा प्रत्येक सुवासिनीसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण असतो, ज्या दिवशी पारंपरिक पद्धतीने नटण्याला महिला प्राधान्य देतात. मात्र, वडाच्या झाडाची पूजा करणे, फेऱ्या मारणे आणि उन्हाळा किंवा उकाड्याच्या वातावरणात तासनतास फिरणे यामुळे जड साड्या सांभाळणे खूप कठीण होऊन बसते. विशेषतः ज्या महिलांना सणाच्या दिवशीही ऑफिसला जावे लागते, त्यांच्यासाठी तर जड कपडे परिधान करणे मोठी डोकेदुखी ठरते. अशा वेळी कम्फर्ट आणि पारंपरिक लुकचा उत्तम मेळ घालणारी 'मलमल लोटस कॉटन साडी' सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय ठरत आहे. वजनाला अत्यंत हलक्या आणि मऊ असणाऱ्या या साड्यांवरील कमळाची नाजूक नक्षी सणाचे सौंदर्य टिकवून एक क्लासी आणि कॉर्पोरेट लुक मिळवून देते.

पेस्टल शेड्स आणि जरी बॉर्डरचा रिच फॉर्मल लुक
कार्यालयीन वातावरणासाठी (Office wear) सध्या पेस्टल रंगांच्या साड्यांना महिलांची पहिली पसंती मिळत आहे. यामध्ये मिंट ग्रीन, स्काय ब्लू किंवा बेबी पिंक अशा हलक्या रंगाच्या मलमल कॉटन साडीवर हाताने साकारलेली कमळाची सुंदर डिझाईन अत्यंत डिसेंट आणि कूल लुक देते. जर तुम्हाला ऑफिसमध्ये अधिक फॉर्मल आणि रिच लुक हवा असेल, तर जरी बॉर्डर असलेली मलमल लोटस साडी एक उत्तम पर्याय आहे. या साडीच्या काठावर आणि पदरावर सोनेरी किंवा चंदेरी जरीच्या धाग्यांनी कमळाची नक्षी कोरलेली असते, जी दिसायला अत्यंत आकर्षक असून दिवसभर फ्रेश लुक टिकवून ठेवते.

हेही वाचा – Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा 'या' 5 राशींसाठी घेऊन येणार नशिबाची किल्ली; सोमवारसह 3 शुभ संयोगांचा दुर्मीळ योग बदलवणार आयुष्य

ऑफ-व्हाईट आणि मॉडर्न डिजिटल प्रिंट्सचा ट्रेंडी लुक
गुलाबी रंगाची मोठी कमळाची फुले (Lotus Design) प्रिंट केलेली पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाची मलमल साडी सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. वटपौर्णिमेच्या पूजेच्या वेळी हा लुक मनाला अत्यंत प्रसन्न आणि फ्रेश वाटतो. दुसरीकडे, ज्या महिलांना पारंपरिक नक्षीपेक्षा काहीतरी आधुनिक आवडते, त्यांच्यासाठी डिजिटल प्रिंटेड मलमल साडी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. यामध्ये साडीच्या संपूर्ण भागावर किंवा केवळ पदरावर वॉटरकलर इफेक्ट असलेले कमळाचे डिजिटल डिझाईन असते, जे कमालीचे स्टायलिश आणि ऑफिसच्या वातावरणाला अगदी साजेसे दिसते.

एव्हरग्रीन इंडिगो आणि सिल्व्हर ज्वेलरीचे कॉम्बिनेशन
फॅशनच्या जगात इंडिगो म्हणजेच गडद निळा रंग कधीच जुना होत नाही आणि तो नेहमीच ट्रेंडी राहतो. इंडिगो मलमल कॉटन साडीवर पांढऱ्या रंगाची कमळाची वैशिष्ट्यपूर्ण नक्षी किंवा मोराची डिझाईन ऑफिससाठी एक परफेक्ट आणि डौलदार कॉर्पोरेट लुक तयार करते. या इंडिगो साडीसोबत जर ऑक्सिडाईज्ड किंवा सिल्व्हर दागिने परिधान केले, तर तुमचा वटपौर्णिमेचा लुक गर्दीतही उठून दिसेल. या लेटेस्ट डिझाईन्स साड्या यंदाच्या सणाला तुम्हाला उकाड्यापासून आराम तर देतीलच, सोबतच तुमचा फॅशन सेन्सही वाढवतील.

हेही वाचा – International Yoga Day 2026: रोज 9-10 तास बैठे काम करताय? पाठीच्या कण्याच्या समस्या टाळण्यासाठी रोज करा ही 4 सोपी योगासने

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number