थांबा..! फ्रिजमधलं थंडगार पाणी पिताय? पूर्ण बंद करा.. नाहीतर, होतील हे दुष्परिणाम..

उन्हाळ्यात, साधं पाणी म्हणजेच सामान्य तापमानाला असलेल्या पाण्याने तहान भागत नाही, असे म्हणत लोक थंड पाणी पिण्याकडे वळतात. अनेकदा रेफ्रिजरेटेड पाणी प्यायले जाते.

थांबा..! फ्रिजमधलं थंडगार पाणी पिताय? पूर्ण बंद करा.. नाहीतर, होतील हे दुष्परिणाम..

Cold Water Effects In Summer : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी नैसर्गिकपणे पाणी पिण्याची गरज वाढते. त्यातच थंड पाणी प्यायल्याने लोकांना उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी लोक अनेक पेयेही पितात, ज्यामध्ये लस्सी, ज्यूस आणि नारळ पाणी यासह विविध प्रकारच्या पेयांचा समावेश असतो. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी दिवरभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. पण पाणी पिताना त्याचे तापमान योग्य असणे देखील महत्त्वाचे आहे.
पाण्याचे तापमान आरोग्यावर परिणाम करते

उन्हाळ्यात, साधं पाणी म्हणजेच सामान्य तापमानाला असलेल्या पाण्याने तहान भागत नाही, असे म्हणत लोक थंड पाणी पिण्याकडे वळतात. अनेकदा रेफ्रिजरेटेड पाणी प्यायले जाते. तहान भागवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी लोक कधीही थंड पाणी पितात. यामुळे काही काळासाठी उष्णतेपासून आराम मिळतो, पण त्याचे अनेक तोटे देखील आहेत. आयुर्वेदात खूप थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे. विशेषतः रेफ्रिजरेटरमधील थंडगार पाणी अजिबात पिऊ नये. उन्हातून आल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर किंवा जेवणानंतर थंड पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. जर तुम्हीही उन्हाळ्यात चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने थंड पाणी पित असाल तर, त्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होते. अशाच पद्धतीने बर्फाचे पाणी पिणे, फ्रिजमध्ये ठेवलेले किंवा बर्फ घातलेले ज्यूस पिणे, बर्फाचे खडे खाणे यामुळेही असेच परिणाम होतात. याबाबत अधिक जाणून घेऊया..

हेही वाचा – उष्माघात होणं टाळायचंय? मग हे सोपे घरगुती उपाय करा; उन्हाळ्यात राहील थंडावा

पाणी कमी प्रमाणात प्यायले जाते
शरीराची पाण्याची गरज जितकी असते, त्या प्रमाणात पाणी पिण्याचे संदेश मेंदूकडून दिले जातात. त्यानुसार पाणी पिण्याची इच्छा होते आणि आपण पाणी पितो. सामान्य तापमानाचे पाणी याच प्रमाणात प्यायले जाते. मात्र, थंड पाणी त्या प्रमाणात प्यायले जाते नाही. कारण, थोडे पाणी पिताच तहान भागल्यासारखी वाटते. तसेच, यामुळे मेंदूकडून पाण्याच्या आवश्यकतेनुसार दिल्या जाणाऱ्या संदेशात अडथळा निर्माण होतो.

डोकेदुखीची समस्या
जर तुम्ही उन्हातून आल्यानंतर लगेच खूप थंड पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायले तर तुमचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. थंड पाणी पिण्यामुळे तुमच्या मणक्यातील अनेक नसा थंड होऊ शकतात. यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते. ही परिस्थिती सायनसच्या समस्या असलेल्या लोकांसाठी त्रास वाढवू शकते.

घसा खवखवणे
बऱ्याचदा, जेव्हा घसा दुखतो किंवा आवाज बदलतो, तेव्हा वडिलधारे लोक सहजपणे विचारतात की, 'थंड पाणी प्यायले का?' हे खरे देखील आहे. थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो. रेफ्रिजरेटरमधून बाहेर काढलेले थंड पाणी प्यायल्यानंतर अशा समस्या येणे सामान्य आहे. तर, जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास, श्लेष्मा तयार होण्यास सुरुवात होते आणि श्वसनमार्ग अवरोधित होतो. ज्यामुळे घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशात सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही गोष्ट जेवणानंतर आईसक्रीम खाण्यामुळेही होते.

पचनक्रियेवर परिणाम
शरीर कोणताही पदार्थ त्याच्या तापमानात आणते, त्यानंतर तो पदार्थ पुढील पचनासाठी पाठवला जातो. परंतु, खूप कमी तापमानाला असलेला पदार्थ खाल्ल्याने शरीर त्याच्या तापमानाला तो पदार्थ आणण्यास वेळ लागतो. यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अपचनाची समस्या उद्भवते. पोटात थंड पाणी गेल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. संशोधनानुसार, थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. कोणत्याही जेवणानंतर आईस्क्रीम खाणे अशाच प्रकारे समस्या निर्माण करणारे असते.

हृदय गतीवर परिणाम
थंड पाणी प्यायल्याने शरीरात हृदयाचे ठोके देखील कमी होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, रेफ्रिजरेटरमधून खूप थंड पाणी पिल्याने दहाव्या क्रॅनियल नर्व्ह (व्हॅगस नर्व्ह) ला उत्तेजित केले जाते. शरीराच्या अनैच्छिक कार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नसा जबाबदार असतात. कमी तापमानाचे पाणी थेट व्हॅगस मज्जातंतूवर परिणाम करते, ज्यामुळे हृदय गती कमी होते.

हेही वाचा – उन्हाळ्यात साप चटकन हल्ला का करतात? सर्पदंश टाळण्यासाठी घ्या अशी खबरदारी

वजन कमी करण्यात अडचण
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी थंड पाणी पिऊ नये. थंड पाण्यामुळे शरीरात असलेली चरबी जाळणे कठीण होते. रेफ्रिजरेटेड पाण्यामुळे शरीरातील चरबी घट्ट होते, ज्यामुळे चरबी कमी करण्यात समस्या निर्माण होतात आणि वजन कमी होत नाही.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. )

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number