Sonam Kapoor Pregnant: सोनम कपूर पुन्हा आई होणार! खास फोटो शेअर करत स्टायलिश पद्धतीने अभिनेत्रीकडून दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा

अभिनेता अनिल कपूर यांच्या घरात लवकरच आणखी एक सुखद बातमी येणार आहे. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.

Sonam Kapoor Pregnant: सोनम कपूर पुन्हा आई होणार! खास फोटो शेअर करत स्टायलिश पद्धतीने अभिनेत्रीकडून दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा

Sonam Kapoor Pregnant: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिनेता अनिल कपूर यांच्या घरात लवकरच आणखी एक सुखद बातमी येणार आहे. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे. स्टाईल, एलिगन्स आणि मातृत्वाचा सुंदर समन्वय दाखवत सोनमने तिचा बेबी बंप दाखवला. 

सोशल मीडियावर स्टाइलिश अनाउन्समेंट

सोनमने इन्स्टाग्रामवर तिच्या बेबी बंपसह अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये तिने फक्त एकच शब्द लिहिला, “Mom.” अभिनेत्रीने हॉट-पिंक, ओव्हरसाईझ्ड पॅडेड शोल्डर असलेला लक्झरी वूलन सूट परिधान केला होता. हा लूक पाहताच अनेकांनी प्रिन्सेस डायनाच्या आयकॉनिक स्टाईलची आठवण केली. तिच्या स्टोरीमध्ये तिने हेही उघड केले की बाळाचा जन्म 2026 च्या वसंत ऋतूमध्ये अपेक्षित आहे. तिच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहत्यांनी आणि बॉलिवूड स्टार्सनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – Akshay Kumar : ती बुडत होती… तिला वाचवायला अक्षय कुमारने स्वतःचा जीव धोक्यात घातला, कोण आहे ती?

पहिल्या गरोदरपणानंतर तीन वर्षांनी पुन्हा गुड न्यूज  

सोनम आणि तिचे व्यावसायिक पती आनंद आहुजा यांचे 2018 मध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न झाले. 20 ऑगस्ट 2022 रोजी या जोडप्याने आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्या वेळी त्यांनी लिहिले होते की, ‘ही फक्त सुरुवात आहे, पण आमचे जीवन आता कायमचे बदलले.’ गेल्या काही काळापासून सोनम फिल्मी दुनियेपासून दूर असून कौटुंबिक जीवन एन्जॉय करत आहे. सध्या संपूर्ण बॉलिवूड तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची बातमी सेलिब्रेट करत आहे, आणि चाहतेही नव्या पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number