Small Savings Schemes: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अल्प बचत योजनांवरील व्याजदर कायम

या तिमाहीसाठी व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दर मागील तिमाहीप्रमाणेच राहणार आहेत.

Small Savings Schemes: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अल्प बचत योजनांवरील व्याजदर कायम

Small Savings Schemes: केंद्र सरकारने ऑक्टोबर-डिसेंबर 2025 तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि इतर पोस्ट ऑफिस लघु बचत योजनांवरील व्याजदर जाहीर केले आहेत. या तिमाहीसाठी व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दर मागील तिमाहीप्रमाणेच राहणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार, या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी प्रमुख योजना आणि त्यांच्या व्याजदर पुढीलप्रमाणे आहेत:

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS): 8.2 टक्के वार्षिक
मासिक उत्पन्न खाते योजना (MIS): 7.4 टक्के वार्षिक
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC): 7.7 टक्के वार्षिक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): 7.1 टक्के वार्षिक
किसान विकास पत्र (KVP): 7.5 टक्के वार्षिक
सुकन्या समृद्धी खाते (SSA): 8.2 टक्के वार्षिक

हेही वाचा – GST New Rates: सरकारची दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर करडी नजर! ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी GST कपातीची छाननी सुरू

गेल्या काही महिन्यांत महागाई आणि रेपो दरात घट झाली आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारीपासून रेपो दर 6.5 टक्के वरून सध्या 5.5 टक्क्यांवर आणला आहे. तसेच किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये फक्त 2.07 टक्के नोंदवली गेली. तरीही, केंद्र सरकारने लघु बचत योजनांवरील व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत.

हेही वाचा – Gold Rate : सोन्याला झळाळी ! 14 वर्षांतील सर्वात मोठी तेजी, ग्राहक मात्र चिंतेत

दरम्यान, शेवटचा व्याजदर बदल जानेवारी-मार्च 2024 मध्ये झाला होता. त्यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचा दर 8.0 टक्के वरून 8.2 टक्के केला गेला. तसेच तीन वर्षांच्या एफडी दरात किंचित वाढ करून 7.0 टक्के वरून 7.1 टक्के करण्यात आला होता. सरकारने ही पावले वित्तीय स्थिरता राखण्याच्या दृष्टीने आणि गुंतवणूकदारांसाठी योजना आकर्षक ठेवण्यासाठी उचलण्यात आली आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number