Rupee vs USD: रुपयाची विक्रमी घसरण! इतिहासात पहिल्यांदाच गाठली नीचांकी पातळी; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, या दोन मुख्य कारणांमुळे रुपयाला हा मोठा धक्का बसला आहे.

Rupee vs USD: रुपयाची विक्रमी घसरण! इतिहासात पहिल्यांदाच गाठली नीचांकी पातळी; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

Rupee vs USD: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत चिंतेचा ठरला आहे. परकीय चलन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून, भारतीय रुपयाने (INR) इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. पहिल्यांदाच एका अमेरिकन डॉलरची किंमत 96 रुपयांच्या पार गेली आहे. पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, या दोन मुख्य कारणांमुळे रुपयाला हा मोठा धक्का बसला आहे. बाजार उघडताच सुरू झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

खाद्यवस्तू आणि डाळी महागण्याची शक्यता
रुपयाचे मूल्य घटल्याचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला बसणार आहे. भारत आपल्या गरजेची मोठी डाळ आणि खाद्यतेले (विशेषतः पाम तेल) परदेशातून आयात करतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे या वस्तूंच्या आयातीसाठी आता अधिक डॉलर्स मोजावे लागणार आहेत. परिणामी, येत्या काही दिवसांत डाळी आणि शुद्ध खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ होऊन सामान्य माणसाचे बजेट कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

इंधन दरवाढ आणि महागाईचा भडका
रुपयाच्या अवमूल्यनाचा सर्वात मोठा परिणाम इंधन दरांवर होणार आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. रुपया 96 च्या पुढे गेल्याने ही आयात आता प्रचंड महाग होणार आहे. यामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच वाढणार नाहीत, तर मालवाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे फळे, भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ होऊ शकते. यामुळे सर्वसामान्यांना महागाईच्या दुहेरी संकटाचा सामना करावा लागेल.

हेही वाचा – Gold Monetization : स्वतःचा व्यवसाय वाचवण्यासाठी सराफ पेढ्या, संघटनांचा सरकारपुढे 'हा' प्रस्ताव; घराघरातील सोने इथून पुढे…

कर्जाचे हप्ते (EMIs) वाढणार?
रुपयाला सावरण्यासाठी आता भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) कठोर पावले उचलावी लागू शकतात. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. जर व्याजाचे दर वाढले, तर तुमच्या गृहकर्जाचे (Home Loan) आणि वाहनकर्जाचे (Car Loan) समान मासिक हप्ते म्हणजेच EMI वाढणार आहेत. एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कर्जाचा बोजा, अशा कात्रीत सामान्य माणूस अडकण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number