Money Laundering Case: मोठी कारवाई! ED कडून माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त

ही कारवाई 1xBet, 1xBat आणि 1xBat Sporting Lines या बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा भाग आहे.

Money Laundering Case: मोठी कारवाई! ED कडून माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची मालमत्ता जप्त

Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग रॅकेट प्रकरणात मोठी कारवाई करत माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटींच्या मालमत्तेची जप्ती केली आहे. ही कारवाई 1xBet, 1xBat आणि 1xBat Sporting Lines या बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा भाग आहे. विविध राज्यांतील पोलीस तक्रारींवरून ईडीने तपास सुरू केला होता. तपासात असे उघड झाले की या संस्थांनी भारतीय वापरकर्त्यांना लक्ष्य करून बेकायदेशीर ऑनलाइन जुगार सेवा पुरवल्या.

हेही वाचा – Droupadi Murmu Meet Women’s Indian Team: विश्वचषक विजयानंतर महिला संघाने घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट; राष्ट्रपती म्हणाल्या, 'तुम्ही नवीन पिढीसाठी…'

जप्त मालमत्ता तपशील

ईडीने सुरेश रैना यांच्या 6.64 कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवन यांची 4.5 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती केली आहे.

हेही वाचा – 'तुमच्या चेहऱ्यावरील तेज…', महिला खेळाडूच्या 'या' भन्नाट प्रश्नावरील पंतप्रधानांची रिॲक्शन पाहाच

सरोगेट जाहिरातींमधून पैसा लपवला 

ईडीच्या मते, रैना आणि धवन यांनी 1xBetच्या सरोगेट ब्रँड्ससाठी परदेशी कंपन्यांशी जाहिरातीचे करार केले होते. या जाहिरातींचे पैसे बेकायदेशीर बेटिंग ऑपरेशन्समधून मिळालेल्या उत्पन्नातून दिले गेले होते आणि ते स्तरित परदेशी व्यवहारांद्वारे मनी लाँड्रिंगसाठी वापरले गेले, असा आरोप ईडीने केला आहे.  काही दिवसांपूर्वीच ईडीने या प्रकरणात अनेक प्रमुख खेळाडू आणि चित्रपट कलाकारांविरुद्ध चौकशी सुरू केली होती. तपासादरम्यान युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, शिखर धवन, सोनू सूद (अभिनेता), मिमी चक्रवर्ती (माजी खासदार), अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता), तसेच, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे जबाबही नोंदवले गेले आहेत. या कारवाईनंतर ऑनलाइन बेटिंग आणि फसव्या जाहिरातींमध्ये गुंतलेल्या सेलेब्रिटींना मोठा इशारा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number