Palash Muchhal Video: स्मृती मानधनासोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच विमानतळावर स्पॉट झाला पलाश मुच्छल; पापाराझींच्या प्रश्नांकडे केलं दुर्लक्ष

विमानतळावर त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात ते आपल्या आई आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह बाहेर पडताना दिसत आहे.

Palash Muchhal Video: स्मृती मानधनासोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच विमानतळावर स्पॉट झाला पलाश मुच्छल; पापाराझींच्या प्रश्नांकडे केलं दुर्लक्ष

Palash Muchhal Video: क्रिकेटपटू स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर चित्रपट निर्माते पलाश मुच्छल प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसले. विमानतळावर त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात ते आपल्या आई आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह बाहेर पडताना पापाराझींच्या प्रश्नांकडे कोणतेही लक्ष न देता सरळ पुढे जाताना दिसत आहेत.

हेही वाचा – Suraj Chavan Wedding : सूरजच्या लग्नात गोंधळ; जान्हवी किल्लेकरचा थेट पाहुण्यांना दम, ‘मी हात जोडते’

पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र, अगदी लग्नाच्या काही दिवस आधीच स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने निर्णय

स्मृती मानधनाच्या व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी सांगितलं होतं की, ‘आज सकाळी नाश्ता करत असताना स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. आम्ही थोडा वेळ परिस्थिती स्थिर होण्याची वाट पाहिली, परंतु प्रकृती आणखी खालावल्याने रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.’ 

हेही वाचा – Sunil Gavaskar: सुनिल गावसकरांचा साऊथ आफ्रिकेच्या कोचला सल्ला; “वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्या”

मिश्रा यांनी पुढे सांगितले, स्मृतीचा तिच्या वडिलांशी खूप जास्त बाँड आहे. त्यामुळे ते पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा तिने निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सूचनांनुसार त्यांना काही काळ रुग्णालयात राहावे लागणार आहे. स्मृतीला लग्नापेक्षा तिच्या वडिलांचे स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे. लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छलने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नसले तरी, विमानतळावरील त्याच्या वागणुकीतून परिस्थितीवर शांत प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न दिसून आला. पापाराझींनी केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता त्याने आपल्या कुटुंबासह पुढे जाणे पसंत केले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number