Labour Code : आठवड्यातून 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! नवीन कामगार कायद्यातील ‘या’ अटी माहिती आहेत का?

कोणताही बॉस किंवा कंपनी व्यवस्थापन हा नियम कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने लादू शकत नाही. हा नियम पूर्णपणे ऐच्छिक असेल. व्यवस्थापन आणि कर्मचारी या दोघांची सहमती असेल तरच तो लागू केला जाईल.

Labour Code : आठवड्यातून 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी! नवीन कामगार कायद्यातील ‘या’ अटी माहिती आहेत का?

Labour Code : भारतातील खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट जगतात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विषयाची उत्सुकता होती, तो 'फोर-डे वर्क वीक' चा नियम आता प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नवीन कामगार कायद्यानुसार कंपन्यांना त्यांच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल करण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आठवड्यातून सलग 3 दिवस सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, म्हणजेच आठवड्यातून फक्त 4 दिवसच ऑफिसला जावे लागेल. मात्र, ही आकर्षक वाटणारी सुट्टी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना एका अत्यंत महत्त्वाच्या अटीचे पालन करावे लागणार आहे.

सुट्टी 3 दिवसांची, पण रोज 12 तास लॉग-इन अनिवार्य!
नवीन कामगार कायद्यानुसार, कामाचे दिवस कमी होणार असले तरी संपूर्ण आठवड्याच्या एकूण कामाच्या तासांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. सध्याच्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकूण 48 तास काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही 4 दिवसांच्या कामाचा पर्याय निवडला, तर तुम्हाला रोज तब्बल 12 तास काम करावे लागेल. अर्थात, या 12 तासांच्या शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीची आणि जेवणाची वेळ देखील समाविष्ट असेल. ज्या कर्मचाऱ्यांना आठवड्याच्या शेवटी लाँग वीकेंड हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि सोयीचा पर्याय ठरू शकतो.

नियम ऐच्छिक; सक्ती केल्यास दुप्पट ओव्हरटाईम द्यावा लागणार
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती नियम 2026 नुसार, आता दैनंदिन पाळीपेक्षा संपूर्ण आठवड्याच्या एकूण तासांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोणताही बॉस किंवा कंपनी व्यवस्थापन हा नियम कर्मचाऱ्यांवर जबरदस्तीने लादू शकत नाही. हा नियम पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि व्यवस्थापन व कर्मचारी या दोघांच्या परस्पर सहमतीनेच लागू केला जाईल. याशिवाय नव्या कायद्यात ओव्हरटाईमचे नियम अतिशय कडक करण्यात आले आहेत. जर कोणत्याही कंपनीने एखाद्या कर्मचाऱ्याकडून आठवड्यातून 48 तासांपेक्षा जास्त काम करून घेतले, तर व्यवस्थापनाला सामान्य पगाराच्या दुप्पट दराने ओव्हरटाईम देणे बंधनकारक असेल.

हेही वाचा – Gold-Siver Rates Toaday : आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; चेन्नईत सोने झाले स्वस्त, तर मुंबई-दिल्लीत भाव वाढले!

या क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा
हे नवीन फोर-डे वर्क मॉडेल सर्वच प्रकारच्या उद्योगांसाठी सोयीस्कर असणार नाही. याचा सर्वाधिक फायदा ज्ञान-आधारित आणि डिजिटल क्षेत्रातील व्यावसायिकांना होईल, जिथे प्रकल्प-आधारित कामे जास्त असतात.

आयटी (IT) आणि आयटीईएस (ITeS) क्षेत्र

ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC)

डिजिटल मार्केटिंग आणि क्रिएटिव्ह डिझाइन क्षेत्र

या क्षेत्रांमध्ये वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड मॉडेल आधीच यशस्वी ठरल्यामुळे तिथे 12 तासांची शिफ्ट आणि 3 दिवस सुट्टी लागू करणे व्यवस्थापनाला सोपे जाणार आहे.

24 तास सुरू राहणाऱ्या सेवांसमोर मोठे आव्हान
आयटी क्षेत्रासाठी हा कायदा फायदेशीर असला, तरी अनेक सेवाभावी आणि उत्पादन क्षेत्रांना याची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण जाणार आहे. प्रामुख्याने आरोग्यसेवा आणि रुग्णालये, हॉटेल्स, किरकोळ विक्री, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि कारखाने या क्षेत्रांमध्ये सेवांची मागणी 24 तास आणि सातही दिवस (24/7) असते. अशा ठिकाणी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून 4 दिवसांचे वर्क मॉडेल राबवणे हे व्यवस्थापनासाठी एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नसेल.

हेही वाचा – India GDP Growth: पश्चिम आशियातील संकटाचा भारताला मोठा फटका; GDP वाढीचा वेग मंदावणार, संयुक्त राष्ट्रांचा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number