Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात? कढीपत्त्याच्या तेलात मिसळा ‘हे’ 5 घरगुती घटक; केस होतील मजबूत अन् चमकदार

बाजारात मिळणाऱ्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक रसायने असल्याने अनेकदा त्यांचे दुष्परिणाम पाहायला मिळतात.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात? कढीपत्त्याच्या तेलात मिसळा ‘हे’ 5 घरगुती घटक; केस होतील मजबूत अन् चमकदार

Monsoon Hair Care Tips: पावसाळा सुरू झाला की उन्हाळ्याच्या काहिलीपासून आराम मिळतो, मात्र दुसरीकडे हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे (Humidity) केस गळणे, टाळू तेलकट होणे, कोंडा आणि तीव्र खाज सुटणे यांसारख्या समस्या डोके वर काढतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या हेअर केअर प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक रसायने असल्याने अनेकदा त्यांचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. म्हणूनच, सुरक्षित आणि दीर्घकालीन परिणामांसाठी सध्या नैसर्गिक व घरगुती उपायांकडे लोकांचा कल झपाट्याने वाढतो आहे. यामध्ये कढीपत्त्याचे तेल (Curry Leaf Oil) केसांसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. कढीपत्त्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांच्या मुळांना पोषण देतात, पण या तेलामध्ये आणखी काही घरगुती घटक मिसळून वापरल्यास त्याची ताकद दुप्पट होते.

केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कढीपत्त्याच्या तेलासोबत खालील 5 नैसर्गिक घटकांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो:

खोबरेल तेल (Coconut Oil): टाळूला खोलवर ओलावा देण्यासाठी 2 चमचे कढीपत्त्याच्या तेलात 1 चमचा खोबरेल तेल मिसळून हे मिश्रण कोमट करावे. या मिश्रणाने 10 मिनिटे टाळूवर हलकी मालिश करून 1 ते 2 तासांनंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावेत.

मेथी दाणे (Fenugreek Seeds): मेथी दाण्यांमध्ये मुबलक प्रथिने (Protein) आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे कमकुवत केसांना मुळापासून मजबूत करते. कढीपत्त्याच्या तेलात मेथी दाण्यांची पूड किंवा मेथीचे तेल मिसळून आठवड्यातून 2 वेळा केसांना लावावे.

कोरफड जेल (Aloe Vera Gel): पावसाळ्यात टाळू कोरडी पडणे किंवा कोंड्यामुळे खाज येणे यावर कोरफड जेल आणि कढीपत्त्याच्या तेलाचे मिश्रण गुणकारी ठरते. यामुळे डोक्याच्या त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो.

कांद्याचा रस (Onion Juice): कांद्यामध्ये असणारे सल्फर केसांची मुळे घट्ट करण्यासाठी ओळखले जाते. कढीपत्त्याच्या तेलात कांद्याचा रस एकत्र करून लावल्याने केसांचे गळणे लक्षणीयरित्या कमी होते.  

व्हिटॅमिन ई तेल (Vitamin E Oil): केसांची गमावलेली चमक परत मिळवण्यासाठी आणि कोरडेपणा घालवण्यासाठी कढीपत्त्याच्या तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिसळून लावणे फायदेशीर ठरते.

आहार आणि केसांची दैनंदिन काळजी ठरेल महत्त्वाची

केसांचे आरोग्य केवळ वरून उपचार करून सुधारत नाही, तर त्यासाठी अंतर्गत पोषणही तितकेच गरजेचे असते. यासाठी रोजच्या आहारात अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ, आवळा, भिजवलेले बदाम, अक्रोड, चिया सीड्स, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि हंगामातील ताज्या फळांचा समावेश करावा. 

हेही वाचा – Mushroom: पावसाळ्यात मशरूम खाताय? आधी ही माहिती वाचा; एक चूक ठरू शकते जीवघेणी

यामध्ये असणारी खनिजे, निरोगी फॅट्स आणि जीवनसत्त्वे केसांना आतून मजबूत करतात. यासोबतच पावसाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा सौम्य शॅम्पूने केस धुणे, ओले केस न विंचरणे, टाळू जास्त वेळ ओली न ठेवणे आणि हेअर स्टायलिंग उपकरणांचा अतिवापर टाळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, जर केस गळण्याचे प्रमाण प्रमाणाबाहेर असेल किंवा डोक्यावर लाल पुरळ आली असेल, तर घरगुती उपायांवर वेळ न घालवता थेट त्वचा आणि केसांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number