Goa Nightclub Fire: गोवा नाईटक्लब आग प्रकरणात मोठी कारवाई; थायलंडमध्ये आवळण्यात आल्या क्लब मालक लुथरा बंधूंच्या मुसक्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी मानले जाणारे क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे.

Goa Nightclub Fire: गोवा नाईटक्लब आग प्रकरणात मोठी कारवाई; थायलंडमध्ये आवळण्यात आल्या क्लब मालक लुथरा बंधूंच्या मुसक्या

Goa Nightclub Fire: गोव्यातील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईटक्लबमध्ये लागलेल्या आग प्रकरणातील तपासाला मोठा वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानले जाणारे क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही समजते. प्राप्त माहितीनुसार, लुथरा बंधूंविरुद्ध इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याआधीच परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या पासपोर्टचे निलंबन केले होते. या घडामोडींनंतर त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी त्यांच्या ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामिनाच्या सुनावणीदरम्यान, लुथरा बंधूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने ते पळून गेले नसल्याचा दावा केला. थायलंडचा प्रवास हा व्यावसायिक दौरा असल्याचे वकिलांनी सांगितले. तसेच, अधिकारी आणि माध्यमे माझ्यामागे लागली आहेत, माझी इतर रेस्टॉरंट्ससुद्धा पाडण्यात आली आहेत, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा – Fake Dupatta Scam: तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये बनावट रेशमी दुपट्ट्यांचा महाघोटाळा; 10 वर्षांत 54 कोटी रुपये लाटले

आगीच्या घटनेनंतर लुथरा बंधू फरार

गोवा पोलिसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने या दाव्यांना विरोध केला. आगीच्या रात्रीनंतर लुथरा बंधू तात्काळ देशाबाहेर गेले असून, त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. 8 डिसेंबर रोजी पोलिसांनी लुथरा बंधूंच्या घरी भेट दिली असता, त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला जामिन अर्जांवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा – Illegal Exchange Racket: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 3.5 कोटींच्या जुन्या नोटांसह चौघांना अटक

जामिन अर्जांवर आज पुढील सुनावणी

रोहिणी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना यांच्या न्यायालयात या प्रकरणातील संक्रमण अटकपूर्व जामिनाच्या याचिकांवर सुनावणी गुरुवारी होणार आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर बचावकार्य सुरू असतानाच लुथरा बंधूंनी त्याच रात्री थायलंडची तिकिटे बुक केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देश सोडून दिला. त्यानंतर ते फरार होते, अशी नोंद पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number