भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी मुलीची मदत

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. या युद्धात रशियाकडून युक्रेनवर वारंवार क्षेपणास्त्र हल्ला आणि गोळीबार करण्यात येत आहे. दरम्यान युद्धभूमीत अनेक नागरिक अडकले असून भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत पुन्हा मायदेशी आणण्यात येत आहे. तर अद्याप अनेक नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशातच या युद्धात भारताच्या माणुसकीचे दर्शन घडले आहे. पाकिस्तान हा भारताचा शत्रू मानला जातो. […]

भारताकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी मुलीची मदत

रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस आहे. या युद्धात रशियाकडून युक्रेनवर वारंवार क्षेपणास्त्र हल्ला आणि गोळीबार करण्यात येत आहे. दरम्यान युद्धभूमीत अनेक नागरिक अडकले असून भारतीय विद्यार्थ्यांना ऑपरेशन गंगा अंतर्गत पुन्हा मायदेशी आणण्यात येत आहे. तर अद्याप अनेक नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशातच या युद्धात भारताच्या माणुसकीचे दर्शन घडले आहे.

पाकिस्तान हा भारताचा शत्रू मानला जातो. असे असतानाही, भारताने रशिया-युक्रेन युद्धात शेजार धर्म पाळला आहे. युक्रेनमधील भारतीच्या राजदूताने भारतीयांना वाचवण्यासोबतच एका पाकिस्तानी मुलीचीही सुटकेसाठी मदत केली आहे. आस्मा शफिक असे या पाकिस्तानी मुलीचे नाव असून या मुलीने भारताचे आभार मानले आहेत. भारताने आपल्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत केली असून त्यामुळेच घरी सुखरुप जाऊ शकत असल्याच्या भावना तिने या पाकिस्तानी मुलीने व्यक्त केल्या आहेत.

सुमीमधून ६९४ भारतीय विद्यार्थ्यांची सुटका

युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांची सुटका झाली असल्याची माहिती युक्रेन सरकारने दिली आहे. दरम्यान, सुमी शहरात अडकलेल्या नागरिकांच्या स्थलांतराचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सुमीमध्ये ६९४ भारतीय विद्यार्थी अडकले होते. ते मंगळवारी बसने पोल्टावाला सुरक्षित स्थळी रवाना झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number