Rust Stain from Clothes Home Remedies: काही मिनिटांत गायब होतील गंजाचे डाग! घरातील फक्त 2 वस्तूंनी मिळवा पहिल्यासारखी चमक

या उपायासाठी महागडे डिटर्जंट किंवा केमिकल्स लागणार नाहीत. फक्त दोन सामान्य घरगुती वस्तूंनी हे काम होऊ शकते.

Rust Stain from Clothes Home Remedies: काही मिनिटांत गायब होतील गंजाचे डाग! घरातील फक्त 2 वस्तूंनी मिळवा पहिल्यासारखी चमक

Rust Stain from Clothes Home Remedies: कपड्यांवरील गंजाचे डाग दिसायला खूप वाईट दिसतात. त्यांना स्वच्छ करणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरते. विशेषतः पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या कपड्यांवर हे डाग अधिक त्रासदायक ठरतात. साध्या डिटर्जंटने सहज निघणारे डाग जसे कॉफी, चहा किंवा मातीचे असतात. तसे गंजाचे डाग मात्र हट्टी असतात. त्यामुळे लोक आपले आवडते कपडे घालायलाच टाळतात. अशा वेळी सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक सोप्पा आणि स्वस्त घरगुती उपाय तुमची हे डाग घालवण्यासाठी नक्की मदत करू शकतो. या उपायासाठी महागडे डिटर्जंट किंवा केमिकल्स लागणार नाहीत. फक्त दोन सामान्य घरगुती वस्तूंनी हे काम होऊ शकते.

हेही वाचा – Turmeric Water Benefits: हळदीचे पाणी आरोग्यासाठी सुपरड्रिंक, दररोज प्यायल्यास होतील 'हे ' 6 आश्चर्यकारक फायदे

कपड्यावरून गंजाचे डाग काढण्याची पद्धत – 

कपडा सपाट पसरून डाग असलेल्या भागावर भरपूर मीठ लावा
त्यावर ताज्या लिंबाचा रस पिळा, जेणेकरून तो भाग पूर्णपणे भिजेल
जुना टूथब्रश किंवा कपड्यांचा ब्रश घेऊन डाग हलकेच घासा
आता कपडा अर्धा तास उन्हात ठेवा
नंतर धुतल्यावर डाग पूर्णपणे गायब होईल

ही पद्धत परिणामकारक का आहे?

लिंबाचा आंबटपणा गंज विरघळवतो
मीठ स्क्रबप्रमाणे काम करून डाग काढतो.

हेही वाचा – Health Tips: थंड पाण्याने तोंड धुतल्याने मानसिक स्वास्थ्यावर परिणाम, फायदा की तोटा?

काही महत्त्वाच्या खबरदारी

नेहमी हा उपाय फक्त डाग असलेल्या भागावरच वापरून पहा. सिल्क किंवा शिफॉनसारख्या नाजूक कपड्यांवर, प्रथम त्याची चाचणी लहान भागावर करणे महत्वाचे आहे. डाग काढून टाकल्यानंतर, लिंबू आणि मीठाचा प्रभाव काढून टाकण्यासाठी कापड चांगले धुवा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number