Happy Mothers Day 2026 : मायलेकराचं नातं सर्वात गोड! दीपिका पादुकोणपासून कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनी सिद्ध केलंय चाळिशीनंतरही मातृत्व शक्य

मातृत्व हे त्याग आणि अढळ प्रेमाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत मातृत्व आणि आई यांना अनन्यसाधारण स्थान आहे. आताच्या जीवनशैलीत अनेक महिलांना हे मातृत्वाचे सुख त्यांच्या वयाच्या चाळिशीमध्ये मिळत आहे.

Happy Mothers Day 2026 : मायलेकराचं नातं सर्वात गोड! दीपिका पादुकोणपासून कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनी सिद्ध केलंय चाळिशीनंतरही मातृत्व शक्य

Mothers Day 2026 : मातृत्व हे त्याग आणि अढळ प्रेमाचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत मातृत्व आणि आई यांना अनन्यसाधारण स्थान आहे. आपल्या संस्कृतीने आईला कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात परमेश्वराचा दर्जा दिला आहे. दुर्गा माता, काली माता, चण्डिका माता या सर्व देवीस्वरूपांनाही अखिल विश्वाच्या मातेचे स्थान आहे. देवीच्या याच रूपांना प्रत्येक आईमध्ये पाहिले जाते. याच मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी खास दिवस म्हणजेच 'मदर्स डे' साजरा करण्याची सुरुवात अ‍ॅना जार्विस या कन्येने आपल्या आईच्या सन्मानार्थ केली. याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर जगात 1914 पासून मातृदिन साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी  'मदर्स डे' 10 मे 2026 रोजी साजरा होत आहे. 

मातृत्वाच्या वयात बदल
आजच्या आधुनिक काळात मातृत्व स्वीकारण्याच्या वयातही मोठे बदल झाले आहेत. लग्नाचे वाढलेले वय आणि घराबाहेर पडून करिअर यामुळे आता महिलांनी चाळीशीत आई होणे ही बाब सामान्य बनली आहे. काही मातांसाठी ही धाडसाची गोष्ट न राहता एक जाणीवपूर्वक घेतलेला प्रगल्भ निर्णय ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे ही बाब शक्य झाली आहे. वयाच्या 40 व्या वर्षी लाभणारे मातृत्व हे स्त्रीला भावनिक स्थिरता आणि आयुष्यातील अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन येते, ज्यामुळे ती आपल्या पाल्याला अधिक समजूतदारपणे आणि शांतचित्ताने वाढवू शकते; असा अनुभव अनेकांना येऊ लागला आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे या वयातील आव्हाने सुसह्य झाली असली, तरी या प्रवासातील संयम आणि परिपक्वता आई आणि मुलाचे नाते अधिक घट्ट आणि अर्थपूर्ण बनवते. अनेक अभिनेत्रीही वयाच्या चाळिशीत किंवा चाळिशीनंतर आई बनल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone)
बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण वयाच्या 40 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. दीपिकाने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने आपली मुलगी 'दुआ' सोबतचा एक गोंडस फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली. 40 व्या वर्षी पुन्हा मातृत्वाचा निर्णय घेऊन तिने अनेकांसाठी प्रेरणा दिली आहे.

कॅटरीना कैफ (Katrina Kaif)
कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वीच 'विहान' या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. वयाच्या 40 व्या वर्षी कॅतरीनाने नैसर्गिकरीत्या आई बनून आपल्या कुटुंबात आनंदाची लकेर आणली. विशेष म्हणजे, आपल्या गरोदरपणाच्या काळात कॅटरीना प्रसिद्धीझोतापासून पूर्णपणे दूर होती.

सोनम कपूर (Sonam Kapoor)
सोनम कपूर 29 मार्च रोजी दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला असून तिला 'वायू' नावाचा मोठा मुलगाही आहे. सोनमने तिची ही 'मदरहुड जर्नी' चाहत्यांसोबत वेळोवेळी शेअर केली आहे. नुकताच तिने हॉस्पिटलमधील एक विना-मेकअप फोटो शेअर करून आई झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांवरही भाष्य केले होते.

भारती सिंग (Bharti Singh)
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने 19 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. तिने आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव 'काजू' ठेवले आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये तिने 'लक्ष' (निकनेम- गोला) या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. हर्ष लिंबाचिया आणि भारती या जोडीने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माचा आनंद चाहत्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला.

हेही वाचा – Child Kidney Health: तुमच्या चिमुरड्याच्या डोळ्यांखाली किंवा पायावर सूज दिसतेय? सावध राहा, किडनी विकाराचे असू शकतात संकेत 

करिश्मा तन्ना (Karishma Tanna)
टीव्ही आणि चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील या यादीत समाविष्ट आहे. वयाच्या 42 व्या वर्षी करिश्मा पहिल्यांदाच आई होणार आहे. नुकतेच तिने आपल्या 'बेबी बंप'सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi)
टीव्हीवरील लोकप्रिय 'सून' दिव्यांका त्रिपाठीने गेल्या महिन्यातच आपल्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी दिव्यांका जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली असून ती सध्या हा सुंदर काळ अनुभवत आहे.

आई होण्यासाठी 30 वर्षांपर्यंतचे वय सर्वोत्तम असते आणि त्यानंतर महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, ग्लॅमर विश्वातील या आघाडीच्या अभिनेत्रींनी हे सर्व समज खोटे ठरवले आहेत. बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींनी वयाच्या 40 व्या वर्षी नैसर्गिकरीत्या आई बनून एक नवा ट्रेंड सेट केला आहे. अर्थातच, हा ट्रेंड सध्या अतिउच्चशिक्षित किंवा अत्यंत व्यग्र जीवनशैली असलेल्या मातांमध्येच पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Benefits of Ghee: अमृतासारखे गुणकारी 'साजूक तूप'! रोज फक्त एक चमचा खा आणि 'या' गंभीर आजारांना पळवून लावा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number