Hair Care Tips : केस बांधून झोपावे की मोकळे सोडून? या टिप्स वापरल्यात तर केसांचं तुटणं-गळणं होईल कमी

केसांची काळजी घेतानाच 'झोपताना केस बांधावेत की मोकळे सोडावेत?' हा प्रश्न अनेकांना पडतो. चुकीच्या सवयीमुळे केस कोरडे पडू शकतात किंवा टाळूवर अनावश्यक ताण येऊ शकतो आणि केस कमजोर होतात.

Hair Care Tips : केस बांधून झोपावे की मोकळे सोडून? या टिप्स वापरल्यात तर केसांचं तुटणं-गळणं होईल कमी

Hair Care Tips : सुंदर केस सर्वांनाच हवे असतात. ते गळू नयेत, तुटू नयेत, केसांचे आरोग्य चांगले रहावे, असे सर्वांनाच वाटत असते. केसांची काळजी घेतानाच 'झोपताना केस बांधावेत की मोकळे सोडावेत?' हा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही रात्री झोपताना केसांची कोणती सवय ठेवता, यावर तुमच्या केसांचे आरोग्य आणि तुटणे (Hair Breakage) मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. चुकीच्या सवयीमुळे केस कोरडे पडू शकतात किंवा टाळूवर अनावश्यक ताण येऊ शकतो. केसांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य पद्धत कोणती, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

लांब केसांसाठी चांगला उपाय: सैल वेणी
जर तुमचे केस लांब आणि जाड असतील, तर रात्री सैल वेणी (Loose Braid) घालून झोपणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे केसांमध्ये गुंता होणे आणि ते तुटणे टाळता येते आणि सकाळी केस सहजपणे विचंरता येतात. सैल वेणी घातल्याने केसांमध्ये घर्षण (Friction) कमी होते, टाळूला आराम मिळतो आणि केसांची वाढ वाढण्यास मदत होते.
नेहमी वेगवेगळ्या पद्धतींनी केस कापा. कधी पोनीटेलऐवजी (Ponytail) तर कधीतरी वरच्या दिशेने सैल अंबाडा (Loose Bun) घाला, जेणेकरून केसांच्या एकाच भागावर ताण येणार नाही आणि दररोज केसांची बांधण्याची जागा बदलावी.

केस मोकळे ठेवण्याचे फायदे आणि तोटे
– लहान केस: तुमचे केस लहान असतील, तर तुम्ही ते मोकळे ठेवून सहज झोपू शकता. यामुळे कोणतेही मोठे नुकसान होत नाही.
– टाळूला आराम: केस मोकळे ठेवल्याने टाळूमध्ये (Scalp) रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते.
– लांब केस : तुमचे केस लांब आणि पातळ असतील, तर रात्रभर मोकळे ठेवल्यास ते एकमेकांमध्ये गुंततात. यामुळे केस तुटण्याचे प्रमाण वाढते आणि केस कुरळे (Frizzy) देखील होऊ शकतात.

हेही वाचा – Cow Milk VS Buffalo Milk: रात्री झोपण्यापूर्वी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे? जाणून घ्या

केसांचे नुकसान टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
1.  रबर बँड टाळा: केस बांधण्यासाठी रबर बँडऐवजी सिल्कचे स्क्रंचीज (Silk Scrunchies) वापरा, कारण रबर बँडमुळे केस तुटतात.
2.  उशीचा अभ्रा / कव्हर: कापसाच्या उशीऐवजी सिल्कच्या उशीचा (Silk Pillow Cover) वापर केल्यास केसांचे घर्षण कमी होते, ज्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते.
3.  ओले केस असताना झोपू नये : केस ओले असताना ते सर्वात कमकुवत असतात. त्यामुळे, ओले असताना कधीही झोपू नका. ओले केस बांधल्यास टाळूला बुरशीचा संसर्ग (Fungal Infection) होण्याचा आणि केस तुटण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा – Long-Lasting Makeup: मेकअप दिवसभर टिकवायचा आहे? वापरा ‘या’ खास ट्रिक्स!

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number