Tips for Driving in Fog : धुक्यातून सुरक्षित प्रवास करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

हिवाळ्याच्या दिवसांत दाट धुक्यामुळे प्रवासादरम्यान अनेक आव्हाने उभी राहतात. तुम्ही जर धुक्यातून प्रवास करणार असाल तर, या टिप्स खास तुमच्यासाठी..

Tips for Driving in Fog : धुक्यातून सुरक्षित प्रवास करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Foggy Roads Can Be Deadly : हिवाळ्याच्या दिवसांत दाट धुक्यामुळे प्रवासादरम्यान अनेक आव्हाने उभी राहतात. दृश्यमानता कमी झाल्यामुळे केवळ रस्ताच नाही, तर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणेही कठीण होते. तुमचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी खालील 5 अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1. वेगावर नियंत्रण आणि समोरील वाहनापासून अंतर
धुक्यात गाडी चालवताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे वेगावर मर्यादा ठेवणे. दृश्यमानता जेवढी कमी असेल, तेवढाच गाडीचा वेग कमी ठेवावा. तसेच, तुमच्या गाडीमध्ये आणि समोरील वाहनामध्ये नेहमीपेक्षा जास्त अंतर ठेवा. धुक्यात रस्ते ओले असल्यामुळे अचानक ब्रेक लावल्यास गाडी घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे सुरक्षित अंतर राखणे अपघातापासून वाचवू शकते.

2. फॉग लाइट्स आणि लो-बीम हेडलाइट्सचा वापर
गाडी चालवताना फॉग लाइट्सचा वापर आवर्जून करा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धुक्यात कधीही 'हाय-बीम' हेडलाइट्स लावू नका, कारण त्याचे प्रखर किरण धुक्यातील पाण्याच्या थेंबांवर आदळून परावर्तित होतात आणि चालकाचे डोळे दिपतात. त्याऐवजी 'लो-बीम' हेडलाइट्स वापरा, ज्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग स्पष्ट दिसण्यास मदत होईल.

3. काचांची स्वच्छता आणि डिफॉगरचा वापर
बाहेरील थंड हवा आणि आतील उष्णतेमुळे कारच्या काचांवर वाफ (Condensation) जमा होते. यामुळे पुढचे दिसणे कठीण होते. अशा वेळी कारमधील डिफॉगरचा वापर करा किंवा काचा थोड्या खाली करा जेणेकरून हवा खेळती राहील. वायपर्सचा वापर करून काचांवरील ओलावा सतत साफ करत राहावा, जेणेकरून दृश्यमानता कायम राहील.

हेही वाचा – Floating Village: जगातील एकमेव तरंगतं गाव भारतात! जिथे शाळा, बाजार आणि घरंही पाण्यावर तरंगतात

4. लेन मार्किंग्सचा आधाराने गाडी चालवावी आणि ओव्हरटेकिंगवर टाळावे
रस्त्याच्या कडेला असलेल्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रेषा धुक्यात मार्गदर्शक ठरतात. या रेषांच्या मदतीने तुम्ही तुमची लेन ओळखू शकता. धुक्यात समोरून येणाऱ्या वाहनाचा आणि रस्त्याच्या वळणांचा अंदाज येत नसल्याने ओव्हरटेक करणे अत्यंत धोक्याचे असते. त्यामुळे शक्यतो एकाच लेनमधून शांतपणे गाडी चालवा आणि वारंवार लेन बदलणे टाळा.

5. टोकाच्या परिस्थितीत 'सेफ स्टॉप' आणि इंडिकेटर्स
जर धुके इतके दाट असतील की समोरील 10 फूट अंतरही दिसत नसेल, तर प्रवास सुरू ठेवण्याचा अट्टाहास करू नका. अशा वेळी गाडी रस्त्याच्या कडेला, रहदारीला अडथळा ठरणार नाही अशा सुरक्षित ठिकाणी किंवा पेट्रोल पंपावर उभी करा. गाडी थांबवल्यानंतर तिन्ही इंडिकेटर्स (Hazard Lights) चालू ठेवा, जेणेकरून इतर चालकांना तुमच्या उभ्या असलेल्या गाडीची कल्पना येईल.

हेही वाचा – Indian Railways Rules: बापरे! ट्रेनमध्ये दिली जाणारी चादर चुकीच्या पद्धतीने वापरल्यास होऊ शकतो तुरुंगवास?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number