Ear Care Tips: पावसाळ्यात ओलाव्यामुळे कान दुखण्याची समस्या वाढली? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

वातावरणातील ओलावा थेट कानाच्या आरोग्यावर परिणाम करतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे बदलत्या वातावरणात कानाच्या तक्रारी सुरू होतात.

Ear Care Tips: पावसाळ्यात ओलाव्यामुळे कान दुखण्याची समस्या वाढली? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

Ear Care in Rainy Season: दीर्घ प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाचे आगमन झाल्यामुळे कडक उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आधी तीव्र ऊन आणि त्यानंतर अचानक सुरू झालेला पाऊस अशा वातावरणातील मोठ्या बदलांमुळे अनेकांना आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) कमालीची वाढते आणि सोसाट्याचा वाराही सुटतो. या बदलत्या वातावरणामुळे सध्या अनेकांमध्ये कान दुखण्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेकदा लोकांना या वेदनांमागील मूळ कारण समजत नाही. परंतु, वातावरणातील ओलावा थेट कानाच्या आरोग्यावर परिणाम करतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

ओलाव्यामुळे वाढतो जीवाणू आणि बुरशीचा धोका
कानाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी कानाचा आतील भाग नेहमी कोरडा राहणे अत्यंत आवश्यक मानले जाते. मात्र, पावसाळ्यातील सततच्या दमट वातावरणामुळे कानातील मळ (Earwax) मऊ पडतो. यामुळे कानाच्या नैसर्गिक कार्यात अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींना आधीपासूनच कानाचे किरकोळ विकार आहेत, त्यांच्या कानात या दिवसांत जीवाणू (Bacteria) आणि बुरशीचा (Fungus) संसर्ग होण्याचा धोका कैक पटींनी वाढतो. अनेकदा कानातील या वेदना कोणत्याही गंभीर आजारामुळे नसून, केवळ पावसाळी हवामानातील सर्दी किंवा ॲलर्जीमुळेही उद्भवू शकतात.

हेही वाचा – Monsoon Skin Infection: पावसाळ्यात बाहेरील चिखल-पाण्यापेक्षा घरातील 'या' गोष्टी ठरतात त्वचेच्या आजारांचे कारण; या टिप्स खूप महत्त्वाच्या

कानाचे ओलाव्यापासून रक्षण करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
पावसाळ्यात कानाची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांनी खालील सोपे प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत:
भिजणे टाळावे: ज्या लोकांना कानाचा त्रास वारंवार होतो, त्यांनी पावसात भिजणे पूर्णपणे टाळावे.
कान कोरडे ठेवावे: जर तुम्ही पावसात भिजलात, तर घरी आल्यावर सर्वात आधी कान पूर्णपणे कोरडे करून घ्यावेत.
हेअर ड्रायरचा वापर: सर्व प्रयत्न करूनही कानात पाणी साचल्यासारखे वाटत असल्यास, अगदी कमी तापमानावर हेअर ड्रायरचा (Hair Dryer) दूरवरून वापर करून कानातील ओलावा सुकवता येऊ शकतो.

वेदना कमी करणारे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय
कानातला ओलावा साफ केल्यानंतरही जर कान बंद झाल्यासारखा किंवा जड वाटत असेल, तर काही घरगुती उपचारांचा अवलंब करता येतो. यामध्ये कोमट कापडाने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने कानाच्या बाहेरील आसपासच्या भागाला हलका शेक देणे अत्यंत फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त, 5 ते 10 मिनिटे गरम पाण्याची वाफ घेतल्याने आराम मिळतो. तसेच, कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून गुळण्या केल्याने घसा आणि कानाची नळी (Ear Canal) मोकळी होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय केवळ सुरुवातीच्या सामान्य वेदनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत; त्यामुळे जर कानातील ठणकणे आणि जडपणा सतत कायम राहिला, तर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.

हेही वाचा – Monsoon Health Tips: मान्सूनमध्ये पोटाच्या संसर्गाचा वाढता धोका; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' सवयी आजच बदला, जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number