चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात का? जाणून घेऊ, तज्ज्ञ काय म्हणतात..

बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि अनेक आवश्यक खनिजे तसेच अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ्ड ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

चेहऱ्यावर बदामाचे तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात का? जाणून घेऊ, तज्ज्ञ काय म्हणतात..

Almond Oil Reduces Face Wrinkles : धावपळीचे जीवन, बदलते वातावरण आणि जीवनशैली यांचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो. त्यातच जर त्वचेची योग्य काळजी घेतली गेली नाही तर, त्वचेतील चमकदारपणा निघून जाऊ शकतो. तसेच,  मुरूम आणि अकाली सुरकुत्या येण्याची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी लोकं अनेक प्रकारची बाजारात उपलब्ध असणारी प्रॉडक्टचा किंवा घरगुती उपचारांचा अवलंब करतात.

बदाम तेलात व्हिटॅमिन ई आणि अनेक आवश्यक खनिजे तसेच अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझ्ड ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे सूर्यप्रकाशात आढळते आणि बदाम तेलातही चांगल्या प्रमाणात आढळते. यामुळे बदाम तेलाचा आहारात वापर किंवा बदाम खाणे हा सर्वोत्तम उपाय आहे. मात्र, हे प्रमाणात खाणेही तितकेच आवश्यक आहे. पण ते चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते का? चला, जाणून घेऊया.

हेही वाचा – एकदम टेस्टी! तुम्हाला शेवग्याच्या फुलांची भजी माहीत आहे का? नक्की ट्राय करून पाहा..

काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, बदाम तेलाचा वापर त्वचेवर केल्याने अकाली उद्भवणाऱ्या सुरकुत्या कमी करता येतात. यामुळे तुमची त्वचा मऊ देखील होते. तसेच, त्वचेशी संबंधित अनेक समस्या कमी होऊ शकतात. त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, बदामाचे तेल आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. अनेक लोक ते दुधात मिसळून पितात. पण बदामाचे तेल त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा खूप मऊ होते. तर अशा तऱ्हेने तुमच्या त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यासाठी बदाम तेल कसे फायदेशीर आहे हे की नाही हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

बदाम तेलाचे गुणधर्म
व्हिटॅमिन ई: बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे एक प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे. बदाम तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच या तेलाच्या वापराने सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. व्हिटॅमिन ई सूर्यप्रकाशातूनही मिळते. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कोवळ्या उन्हात फिरणे आवश्यक आहे.

फॅटी अ‍ॅसिडस् : बदाम तेलात ओमेगा-3 आणि ओमेगा-9 फॅटी अ‍ॅसिड असतात, जे त्वचेला खोलवर ओलावा देतात. त्वचा कोरडी झाली की, सुरकुत्या येऊ लागतात. तेव्हा बदाम तेलाचा वापर चेहऱ्यावर केल्यास यामध्ये असलेले फॅटी अ‍ॅसिड त्वचेला हायड्रेट ठेवतात. ज्याने सुरकुत्यांचा समस्या दूर होतात.

दाह-विरोधी गुणधर्म : बदाम तेलात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी करू शकतात.

हेही वाचा – उन्हाळ्यात असा करा पेहराव; म्हणजे उष्णतेचा त्रास होईल निम्म्याने कमी, काळे कपडे तर चुकूनही नका वापरू..

चेहऱ्यावरील अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होतात
बदाम तेलात असलेले गुणधर्मामुळे याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी होऊ शकतात. अशातच तुम्ही त्वचेच्या आरोग्यासाठी जर बदाम तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरले तर ते सुरकुत्या कमी करू शकते. यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते. यामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या अकाली वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात.

कसे वापरायचे
बदाम तेल लावण्यापूर्वी, चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि साफ करा. यानंतर चेहऱ्यावर तेलाचे काही थेंब लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. चेहऱ्याला मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही बदाम तेल रात्री लावून झोपू शकता.

केसांसाठीही बदाम तेल चांगले
रात्री झोपताना थोडेसे बदाम तेल कोमट करून केसांच्या मुळांना चोळून चोळून लावावे. यामुळे केसांच्या मुळांना आणि डोक्याच्या त्वचेला पोषण मिळते आणि केसांचे आरोग्य सुधारते.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number