Zero Down Payment Car Loan: आता डाउन पेमेंटशिवाय खरेदी करता येणार कार! जाणून घ्या झिरो-डाउन पेमेंट स्कीमचे फायदे

बँका आणि ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी खास झिरो-डाउन पेमेंट योजना घेऊन आल्या आहेत. या योजनेमुळे ग्राहकांना शोरूममधून थेट गाडी घरी घेऊन जाता येते, तेही एक रुपयाही डाउन पेमेंट न करता.<br/>

Zero Down Payment Car Loan: आता डाउन पेमेंटशिवाय खरेदी करता येणार कार! जाणून घ्या झिरो-डाउन पेमेंट स्कीमचे फायदे

Zero Down Payment Car Loan: नवीन गाडी घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते, मात्र त्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे डाउन पेमेंट. लाखोंच्या किंमतीची कार घेताना एकदम मोठी रक्कम भरणे सर्वांसाठी शक्य नसते. यामुळे अनेकदा लोक कार खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलतात. पण आता काळजीची गरज नाही. कारण बँका आणि ऑटो कंपन्या ग्राहकांसाठी खास झिरो-डाउन पेमेंट योजना घेऊन आल्या आहेत. या योजनेमुळे ग्राहकांना शोरूममधून थेट गाडी घरी घेऊन जाता येते, तेही एक रुपयाही डाउन पेमेंट न करता.

झिरो-डाउन पेमेंट म्हणजे काय?

या योजनेअंतर्गत, कार खरेदी करताना ग्राहकाला शोरूममध्ये कोणतीही रक्कम भरावी लागत नाही. बँक किंवा फायनान्स कंपनी वाहनाच्या संपूर्ण ऑन-रोड किंमतीचा वित्तपुरवठा करते. ग्राहकाला फक्त निश्चित हप्त्यांद्वारे (EMI) कर्जाची परतफेड करावी लागते. म्हणजेच, तुम्ही सुरुवातीला तुमच्या बचतीतून काही खर्च न करता गाडी घरी आणू शकता.

हेही वाचा – Rupee Strength: RBI ने रुपया मजबूत करण्यासाठी घेतले ‘हे’ 3 महत्त्वाचे निर्णय

वाढलेला ईएमआय

या योजनेचा एक तोटा म्हणजे मासिक ईएमआय तुलनेने जास्त होतो. पण अनेक ग्राहकांसाठी, मोठा डाउन पेमेंट करण्याऐवजी जास्तीचा ईएमआय परवडणारा ठरतो. विशेषतः जे आपली बचत तातडीच्या खर्चासाठी राखून ठेवू इच्छितात, त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे.

कोणत्या बँका देतात ही सुविधा?

सध्या एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्ससह अनेक प्रमुख बँका आणि फायनान्स कंपन्या झिरो-डाउन पेमेंट कार लोन ऑफर करतात. अर्ज प्रक्रिया सोपी असून, कमीत कमी कागदपत्रांसह कर्ज मिळू शकते. मात्र प्रत्येकाला हे कर्ज मंजूर होईलच असे नाही. कर्जासाठी अर्ज करताना ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री, उत्पन्न आणि परतफेडीची क्षमता तपासली जाते.

हेही वाचा – US Tariff Impact on Indian Economy: अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली चिंता

उदाहरणार्थ, जर तुम्ही 60 हजार रुपयांचा टीव्ही खरेदी करत असाल तर सामान्यतः तुम्हाला 10 हजार रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. पण झिरो-डाउन पेमेंट योजनेत तुम्हाला एकही रुपया न भरता तो टीव्ही घरी नेता येतो. हाच नियम कार खरेदीतही लागू होतो. त्यामुळे, जर तुम्ही मोठ्या डाउन पेमेंटच्या ताणामुळे कार खरेदी पुढे ढकलली असेल, तर ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number