Woman Cooks Maggi In Kettle Onboard Train: एक्सप्रेस ट्रेनच्या एसी कोचमध्ये इलेक्ट्रिक केटल लावून मॅगी बनवणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे रेल्वे यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. महिलेने केवळ ट्रेनमध्ये मॅगी शिजवली नाही, तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्टदेखील केला. हेच महिलेच्या अडचणीचे कारण ठरले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी ‘@WokePandemic’ या हँडलवरून X (पूर्वी ट्विटर) वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. कॅप्शनमध्ये विचारण्यात आले होते: “ट्रेनमध्ये अशा प्रकारे स्वयंपाक करणे कायदेशीर आहे का?” हा प्रश्न विचारताच पोस्ट प्रचंड व्हायरल झाला. काही तासांतच व्हिडिओला 3.25 लाख व्ह्यूज आणि 2000 पेक्षा अधिक लाईक्स मिळाले. या व्हिडिओमध्ये एसी कोचमध्ये बसलेली महिला इलेक्ट्रिक केटलमध्ये मॅगी बनवताना दिसते. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबलेली असतानाच महिलेने हा पराक्रम केला. मात्र, ही कोणती ट्रेन होती किंवा घटना नेमकी कधी घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा – Viral Story: असं काय झालं की अवघ्या काही तासांतच तरुणाने नोकरी सोडली? म्हणाला, ‘पहिल्या तीन तासांत…
वापरकर्त्यांची प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये वाद निर्माण झाला. काहींनी याला सामान्य आणि निर्दोष कृत्य म्हटले. तर काहींनी ते पूर्णपणे बेकायदेशीर आणि धोकादायक असल्याचे सांगितले. वाद वाढू लागल्यावर अखेर मध्य रेल्वेने स्पष्ट उत्तर दिले. मध्य रेल्वेने 21 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अधिकृत X हँडलवरून प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘ट्रेनमध्ये इलेक्ट्रिक केटल, कुकर, इंडक्शन, इमर्शन रॉड वापरण्यास सक्त मनाई आहे. हे वर्तन बेकायदेशीर, असुरक्षित आणि दंडनीय गुन्हा आहे.’ तथापी, संबंधित महिला आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या चॅनेलवर कारवाई सुरू असल्याचीही माहिती रेल्वेने दिली.
रेल्वेच्या नियमानुसार, कोचमधील पॉवर सॉकेट्स फक्त मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप सारखी लहान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चार्ज करण्यासाठी असतात. इलेक्ट्रिक केटल सारखी हाय पॉवर उपकरणे वापरल्यास सॉकेट ओव्हरलोड होऊ शकतो. तसेच शॉर्ट सर्किट किंवा स्पार्क होऊ शकतो. याशिवाय, एसी युनिटमध्ये बिघाड होऊ शकतो. रेल्वेने याबद्दल आधीही अनेकदा इशारे दिले आहेत.
Action is being initiated against the channel and the person concerned. Using electronic kettle inside trains is strictly prohibited.
It is unsafe, illegal, and a punishable offence. It can lead to fire incidence and be disastrous for other passengers also.
May also cause… https://t.co/di9vkxrDLv — Central Railway (@Central_Railway) November 21, 2025
रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
रेल्वेने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ट्रेनमध्ये सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या उपकरणांचा वापर करू नका. असा प्रकार आढळल्यास त्वरित अधिकाऱ्यांना कळवा.” या घटनेमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, प्रवासादरम्यान सोय म्हणून अशा स्वयंपाकाच्या कृती धोकादायक ठरू शकतात आणि त्यासाठी दंड बसू ठोठावला जाऊ शकतो.