Parliament Winter Session 2025: संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्याच्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 19 डिसेंबरपर्यंत चालेल, अशी अधिकृत घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहितीही रिजिजूंनी दिली. ‘आम्हाला आशा आहे की हे अधिवेशन रचनात्मक आणि फलदायी ठरेल. लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल,’ असे रिजिजू यांनी सांगितले.
हेही वाचा –Cyber Fraud: तृणमूल खासदार कल्याण बॅनर्जींच्या खात्यातून 55 लाखांची सायबर चोरी! बनावट KYC करून लुटलं
दरम्यान, मागील पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे फारसे कामकाज होऊ शकले नव्हते. 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत एकूण 21 बैठका पार पडल्या, परंतु वाद आणि आक्रमक निदर्शनांमुळे अनेक महत्त्वाचे निर्णय अडून राहिले.
The Hon’ble President of India Smt. Droupadi Murmu ji has approved the proposal of the Government to convene the #WinterSession of #Parliament from 1st December 2025 to 19th December, 2025 (subject to exigencies of Parliamentary business). Looking forward to a constructive &… pic.twitter.com/QtGZn3elvT — Kiren Rijiju (@KirenRijiju) November 8, 2025
हेही वाचा – मोठी बातमी! बिहार सरकारची अदानी पॉवरला 2400 मेगावॅट वीज प्रकल्पाला मंजुरी; सर्वात कमी दरामुळे मिळाली संधी
तथापि, त्या अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर दोन दिवस चर्चा झाली होती, ज्यात 130 हून अधिक खासदार सहभागी झाले. तसेच लोकसभेत 14 विधेयके सादर झाली, त्यापैकी 12 मंजूर झाली. तर राज्यसभेत 15 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. त्यात आयकर विधेयक 2025 समाविष्ट होते, जे नंतर सरकारने मागे घेतले. आता सर्वांचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे, कारण या अधिवेशनात सरकारकडून काही महत्त्वाचे विधेयके आणि आर्थिक निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.