NEET-UG परीक्षेच्या रचनेत होणार अभूतपूर्व बदल? केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात नवीन आराखडा सादर

सध्या ही परीक्षा पारंपारिक लेखी (पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली जाते, ती बदलून पूर्णपणे ऑनलाईन म्हणजे संगणकावर आधारित (Computer-Based Test) करण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

NEET-UG परीक्षेच्या रचनेत होणार अभूतपूर्व बदल? केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात नवीन आराखडा सादर

NEET UG Exam Pattern :  देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'NEET-UG' परीक्षा लवकरच नव्या स्वरूपात घेण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत संपूर्ण माहिती दिली आहे. सध्या ही परीक्षा पारंपारिक लेखी (पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली जाते, ती बदलून पूर्णपणे ऑनलाईन म्हणजे संगणकावर आधारित (Computer-Based Test) करण्याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. 

याशिवाय, 'JEE' परीक्षेच्या धर्तीवर नीट परीक्षासुद्धा 'मेन' आणि 'ॲडव्हान्स' अशा 2 टप्प्यांमध्ये आयोजित केली जाऊ शकते. या बदलांमुळे दरवर्षी सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या परीक्षेची सुरक्षा अधिक कडक होईल आणि पारदर्शकता वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. मात्र, यावर अजून अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही.

नंदन निलेकणी टास्क फोर्सच्या शिफारशींवर अवलंबून असणार अंतिम निर्णय
यंदा नीट परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विविध याचिकांवर न्यायालयात उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्ट केले की, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) एकूण 8 प्रमुख परीक्षांपैकी 7 परीक्षा आधीपासूनच ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे आता नीट परीक्षाही संगणकावर घेण्याच्या पर्यायावर सखोल चर्चा सुरू आहे. या संभाव्य बदलांना अंतिम रूप देण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स आपला अहवाल सादर केल्यानंतरच नवीन परीक्षा पद्धतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सरकारने कोर्टाला सांगितले.

हेही वाचा – Narendra Modi Video: 'मार्क झुकरबर्ग यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी, अन्यथा…' व्हिडीओ हटवल्याने मेटाच्या CEO ला संसदीय समितीचा अल्टिमेटम

विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार; सुरक्षा यंत्रणा होणार हायटेक
येत्या 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीपूर्वी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा पद्धतीत कोणताही मोठा बदल घाईगडबडीत किंवा अचानक लादला जाणार नाही, तर विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा अवधी दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यासोबतच पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक प्रशासकीय आणि तांत्रिक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी, डिजिटल एन्क्रिप्टेड प्रश्नपत्रिका आणि जीपीएस ट्रॅकिंग असलेले विशेष लॉक ट्रंक्स यांसारख्या आधुनिक सुरक्षा यंत्रणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाशी (NMC) सखोल चर्चा केल्यानंतरच नवीन परीक्षा पद्धत लागू केली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number