Nitin Gadkari : E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होणार का? नितीन गडकरींनी संसदेत स्पष्टच सांगितलं

नितीन गडकरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देत स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे बहुतांश वाहनांचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही. फक्त काही अतिजुन्या वाहनांमध्ये किरकोळ देखभालीची गरज भासू शकते.<br/>

Nitin Gadkari : E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे नुकसान होणार का? नितीन गडकरींनी संसदेत स्पष्टच सांगितलं

Nitin Gadkari:  देशभरात 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण असलेले 'E20' इंधन वेगाने उपलब्ध केले जात आहे. मात्र, या नव्या इंधनामुळे कार किंवा बाईकच्या इंजिनवर विपरीत परिणाम तर होणार नाही ना, या शंकेने वाहनधारक चिंताग्रस्त होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देत स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे बहुतांश वाहनांचे कोणतेही मोठे नुकसान होणार नाही. फक्त काही अतिजुन्या वाहनांमध्ये किरकोळ देखभालीची गरज भासू शकते.

2016 पूर्वीच्या BS-III वाहनांसाठी काय आहे सल्ला?
राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, 2016 पूर्वी तयार झालेल्या आणि BS-III मानकांचे पालन करणाऱ्या वाहनांमधील काही रबरी भाग आणि गॅस्केट्स E20 इंधनामुळे प्रभावित होऊ शकतात. तथापि, ही कोणतीही मोठी तांत्रिक समस्या नसून गाड्यांच्या नियमित सर्व्हिसिंगदरम्यान हे छोटे भाग सहज बदलता येऊ शकतात. यासाठी इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्याची बिलकूल गरज नाही.

चाचण्यांमधून दिलासादायक निष्कर्ष: इंजिनची झीज नाही
E20 इंधनाच्या सुरक्षिततेची शहानिशा करण्यासाठी इंडियन ऑईल (IOCL), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP), SIAM आणि 'अराई' (ARAI) यांनी संयुक्तपणे दुचाकी व चारचाकी वाहनांवर व्यापक संशोधन केले आहे. या अभ्यासाअंती असे स्पष्ट झाले आहे की, E20 च्या वापरामुळे इंजिन सुरू होण्यात अडथळा, चालवण्याचा अनुभव किंवा इंजिनच्या धातू-प्लास्टिकच्या भागांवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. तसेच इंजिनची अतिरिक्त झीज होत नसल्याचेही सिद्ध झाले आहे.

हेही वाचा – Nirmala Sitharaman : 'त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा'; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महेश काळेंचे केले भरभरून कौतुक

इंधनामुळेच मायलेज घटते का? सरकारने मांडली वस्तुस्थिती
E20 इंधनामुळे गाड्यांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवर बोलताना गडकरींनी स्पष्ट केले की, वाहनाचे मायलेज हे केवळ इंधनाच्या प्रकारावर अवलंबून नसते. रस्त्यांची स्थिती, ट्रॅफिक, गाडी चालवण्याची शैली आणि वाहनाची नियमित देखभाल हे घटकही मायलेज ठरवण्यात तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे केवळ E20 इंधनाला मायलेज कमी होण्यासाठी जबाबदार धरणे अयोग्य आहे.

चाचण्यांनंतरच E20 इंधन बाजारात; नवीन वाहनधारकांनी बिनधास्त राहावे
E20 इंधन बाजारात आणण्यापूर्वी अनेक वर्षे प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष रस्त्यांवर कठोर चाचण्या घेण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. जागतिक स्तरावरही अनेक देशांमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधन यशस्वीपणे वापरले जात आहे. त्यामुळे तुमचे वाहन नवीन किंवा E20 अनुकूल असेल, तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त २०१६ पूर्वीचे BS-III वाहन असल्यास पुढील सर्व्हिसिंगच्या वेळी रबरी गॅस्केट्स तपासून घेणे फायदेशीर ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number