Power Bank Safety Tips : सावधान! पॉवर बँक ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या ती कशी तयार होते आणि आग लागण्यामागची कारणे

हल्ली पॉवरबँक अनेकांना वापरावी लागते. तेव्हा, या छोट्या उपकरणाचा स्फोट नेमका का होतो आणि ते कसे बनवले जाते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Power Bank Safety Tips : सावधान! पॉवर बँक ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या ती कशी तयार होते आणि आग लागण्यामागची कारणे

Power Bank Safety Tips : हल्ली पॉवरबँक अनेकांना वापरावी लागते. ऐनवेळी मोबाईल चार्जिंग करण्यसाठी याचा मोठा उपयोग होतो. पण सध्या अनेक विमान कंपन्यांनी आता प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. काही काळापूर्वी चंदीगड विमानतळावर इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा स्फोट झाल्याची घटना घडली. सुदैवाने विमान लँड झालेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे पॉवर बँकच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यामुळेच विमान कंपन्यांनी विमानात पॉवरबँक वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत, या छोट्या उपकरणाचा स्फोट नेमका का होतो आणि ते कसे बनवले जाते, हे समजून घेणे आवश्यक आहे.

पॉवर बँकची अंतर्गत रचना
पॉवर बँक म्हणजे प्लास्टिक किंवा धातूच्या आवरणात बसवलेली एक बॅटरी असते. याची रचना खालीलप्रमाणे असते:
– यामध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह बाजू (धन आणि ऋण) असते.
– या दोन्ही बाजूंच्या मध्ये कागदासारखा अत्यंत पातळ 'मिडल फिल्म' किंवा डिवाइडर असतो.
– बॅटरीच्या आत 'इलेक्ट्रोलाइट' नावाचा एक ज्वलनशील द्रव भरलेला असतो, ज्यातून विद्युत प्रवाह वाहतो.
– हे संपूर्ण पॅकेट अत्यंत दाबाखाली (Under Pressure) घट्ट सीलबंद केलेले असते.
– चार्जिंगदरम्यान आयन्स या द्रवातून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वेगाने प्रवास करतात आणि अनप्लग केल्यावर पुन्हा मूळ जागी येतात.

हेही वाचा – New BEE Star Rating Rules: BEE स्टार रेटिंगचे नियम आता अधिक कडक; 1 ते 5 स्टारचा नेमका अर्थ काय? UPPCL ने सांगितलं वीज बचतीसाठी सोपं गणित

आग लागण्याची प्रमुख कारणे
पॉवर बँक अचानक फुटत नाही, तर त्यामागे काही तांत्रिक बिघाड किंवा चुकीचा वापर कारणीभूत असतो. आग लागण्याची मुख्य कारणे जाणून घेऊ..
– जादा उष्णता (Overheating): पॉवर बँक गरम ठिकाणी ठेवल्यास किंवा सततच्या वापरामुळे तो ओव्हरहीट झाल्यास स्फोटाचा धोका वाढतो.
– फिजिकल डॅमेज: जर पॉवर बँक उंचावरून खाली पडला, तर त्यातील अंतर्गत डिवाइडर खराब होऊ शकतो. यामुळे केमिकल रिॲक्शनमध्ये बिघाड होऊन आग लागू शकते.
– निकृष्ट दर्जाचा चार्जर: खराब क्वालिटीचे चार्जर व्होल्टेज नियंत्रित करू शकत नाहीत. यामुळे बॅटरीमधील डिवाइडर हळूहळू कमकुवत होतो.
– जुनी झाली असल्यास : पॉवर बँक खूप जुना झाल्यास त्यात गॅस तयार होऊन तो फुगतो. अशा स्थितीत त्याचा वापर करणे जीवावर बेतू शकते.

स्फोट नेमका कसा होतो?
जेव्हा कोणत्याही कारणाने अंतर्गत डिवाइडर निकामी होतो, तेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू एकमेकांच्या संपर्कात येतात. यामुळे वीज चुकीच्या मार्गाने वाहू लागते आणि आतील इलेक्ट्रोलाइट द्रव प्रचंड गरम होतो. या प्रक्रियेमुळे बॅटरीच्या आत गॅसचा दाब निर्माण होतो आणि जेव्हा हा गॅस बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पॉवर बँकचा स्फोट होतो किंवा त्याला आग लागते.

हेही वाचा – Reels Cyber Crime: व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंक्स वरून Instagram रिल्स पाहताय? जरा जपून! मेटाने दिली धोक्याची घंटा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number