Bihar Election 2025: NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वी चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा

एनडीए घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे.

Bihar Election 2025: NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वी चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा

Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. एनडीए घटक पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) ने मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा दावा करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे. एलजेपी (रामविलास)च्या खासदार शांभवी चौधरी यांनी पाटण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल आणि नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.'

हेही वाचा – Bihar Elections 2025 : बिहारमधील MY समीकरण नेमकं आहे तरी काय, निकालावर किती होऊ शकतो परिणाम?

महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी 18 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार असल्याचं विधान केल्यानंतर, शांभवी यांनी त्यांच्यावर टीका करत म्हटलं की, 'स्वप्न पाहणे चांगले आहे, पण मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहू नका. बिहारच्या जनतेने नितीश कुमार यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.' त्या पुढे म्हणाल्या की, निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासांचा वेळ शिल्लक आहे आणि संपूर्ण देश 14 नोव्हेंबर रोजी कोण सत्तेवर येईल याची वाट पाहत आहे. जेडीयू कार्यकर्त्यांनी लावलेल्या “टायगर जिंदा है” पोस्टर्सचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, 'हे पोस्टर्स जनतेच्या भावनांचे प्रतीक आहेत, कारण नितीश कुमार अजूनही लोकांच्या हृदयात आहेत.'

हेही वाचा – Bihar Election 2025 : नितीश कुमार की तेजस्वी यादव; बिहारवासियांचा कौल कुणाला? उद्या होणार स्पष्ट

शांभवी चौधरी यांनी पुढे नमूद केले की, नितीश कुमार 2005 पासून सतत जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत महिला सक्षमीकरण आणि कायदा-सुव्यवस्था सुधारली आहे. आज बिहारमध्ये लोकशाही मजबूत झाली आहे, असं त्या म्हणाल्या. तेजस्वी यादववर टीका करत त्यांनी म्हटलं, 'ते फक्त निवडणुकीच्या काळात दिसतात, पण एनडीए नेते मोदी, नितीश आणि चिराग पासवान वर्षभर लोकांमध्ये राहून काम करतात.'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number