Middle East Conflict: ‘ट्रम्प कोण आहेत?…’; इराणचे राष्ट्राध्यक्ष कडाडले; अणूकार्यक्रमावर अमेरिकेला दिलं थेट आव्हान

अणूऊर्जेचा वापर करणे हा इराणचा कायदेशीर आणि सार्वभौम अधिकार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी अमेरिकेच्या प्रयत्नांचे वर्णन 'बाह्य हस्तक्षेप' असे केले आहे.

Middle East Conflict: ‘ट्रम्प कोण आहेत?…’; इराणचे राष्ट्राध्यक्ष कडाडले; अणूकार्यक्रमावर अमेरिकेला दिलं थेट आव्हान

Middle East Conflict:  इराणचा अणूकार्यक्रम थांबवण्यासाठी अमेरिकेकडून होत असलेल्या दबावाला इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अणूऊर्जेचा वापर करणे हा इराणचा कायदेशीर आणि सार्वभौम अधिकार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी अमेरिकेच्या प्रयत्नांचे वर्णन 'बाह्य हस्तक्षेप' असे केले आहे. या विधानामुळे आखाती प्रदेशात आधीच असलेला तणाव आता अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पेझेशकियान यांचा बोचरा सवाल: आम्ही कोणता गुन्हा केला?
'अल जझीरा'ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मसूद पेझेश्कियान यांनी 'इराणी स्टुडंट्स न्यूज एजन्सी' (ISNA) शी बोलताना वॉशिंग्टनवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "डोनाल्ड ट्रम्प दावा करतात की इराण आपल्या अणूविषयक अधिकारांचा वापर करू शकत नाही. परंतु, कोणत्या गुन्ह्यासाठी आम्हाला रोखले जात आहे? एखाद्या स्वतंत्र राष्ट्राचे अधिकार नाकारणारे ते कोण आहेत?" इराणचे तांत्रिक हक्क हिरावून घेण्याचे अमेरिकेकडे कोणतेही वैध कारण नसल्याचे त्यांनी ठामपणे मांडले आहे.

इराण भूमिकेवर ठाम; होर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा तणाव
अणूकार्यक्रमाच्या मुद्द्यावर इराण अमेरिकेसमोर झुकण्यास तयार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकीकडे ट्रम्प यांनी इराणसोबतच्या चर्चेचे वर्णन अतिशय चांगले असे केले असले तरी, दुसरीकडे त्यांनी कडक इशाराही दिला आहे. हा वाद आता 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या नाकेबंदीपर्यंत पोहोचला आहे. इराणने या महत्त्वाच्या जलमार्गावर पुन्हा एकदा निर्बंध लादल्याने जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेही वाचा – North Korea Missile Launch: तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? आता उत्तर कोरियाच्या मिसाईल हल्ल्याने खळबळ

शस्त्रसंधीचा कालावधी संपताच संघर्षाची ठिणगी
गेल्या आठ आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली नाजूक शस्त्रसंधी (Ceasefire) आता संपत आली आहे. हा संघर्ष केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आखाती प्रदेशात पसरला आहे. अमेरिकेने इराणच्या जहाजांवरील निर्बंध न हटवल्यास हॉर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील, असा पवित्रा इराणने घेतल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number