रस्त्यावर ‘चांदीच चांदी!’ हायवेवर प्रवाशांची ही झुंबड आणि.. सत्य जाणून पोलीसही चक्रावले

गढमुक्तेश्वरकडून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमधून हे धातूचे तुकडे बुलंदशहराच्या हद्दीत पडले होते. रस्त्यावर चमकणाऱ्या पांढऱ्या वस्तू पाहून दुचाकी आणि कार चालक अक्षरशः रस्त्यावर उतरले.

रस्त्यावर ‘चांदीच चांदी!’  हायवेवर प्रवाशांची ही झुंबड आणि.. सत्य जाणून पोलीसही चक्रावले

White Metal Fell on Road : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातील ततारपूर बायपासवर सोमवारी दुपारी एक अत्यंत विचित्र आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एका वेगाने जाणाऱ्या ट्रकमधून अचानक पांढऱ्या रंगाच्या धातूचे शेकडो तुकडे रस्त्यावर पडले. हे तुकडे म्हणजे खरोखरीची चांदीच आहे, असा समज झाल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. क्षणार्धात लोकांनी आपली वाहने रस्त्यातच उभी केली आणि ते तुकडे गोळा करण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली.

महामार्गावर प्रवाशांनी सुरू केली 'लूट' आणि झाली वाहतूक कोंडी
गढमुक्तेश्वरकडून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमधून हे धातूचे तुकडे बुलंदशहराच्या हद्दीत पडले होते. रस्त्यावर चमकणाऱ्या पांढऱ्या वस्तू पाहून दुचाकी आणि कार चालक अक्षरशः रस्त्यावर उतरले. कोणी खिशात, तर कोणी पिशव्यांमध्ये हे तुकडे भरू लागले. यामुळे बायपासवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. चांदी मिळाल्याच्या आनंदाने अनेक प्रवाशांनी नियमांची पर्वा न करता महामार्गावर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Sabarimala Temple Gold Theft :'तुम्ही देवालाही सोडले नाही!'; शबरीमला मंदिर सुवर्णचोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावले खडे बोल

पोलीस घटनास्थळी आणि तपास सुरू
वाहतूक कोंडीची माहिती मिळताच हापूड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रथम जमावाला पांगवून वाहतूक सुरळीत केली. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये लोक उत्साहाने तो धातू गोळा करताना दिसत आहेत. तो धातू नेमकी चांदीच आहे की अन्य काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे ट्रकचा शोध
पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पांढरा धातू पडलेला तो ट्रक नेमका कोणाचा होता, याचा शोध घेतला जात आहे. यासाठी महामार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. तो धातू चाचणीसाठी पाठवण्यात येणार असून, लवकरच यामागील सत्य उघड होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. तोपर्यंत हा केवळ लोकांचा समज होता की, खरोखरच मोठी संपत्ती रस्त्यावर सांडली होती, याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा – IRCTC Hotel Scam Case: लालू प्रसाद यादवांना दिलासा नाहीच; दिल्ली उच्च न्यायालयाची CBIला नोटीस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number