India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार कधी अंतिम होणार? ट्रम्प टॅरिफबाबत मोठी अपडेट

दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अलीकडील वक्तव्यांमुळे व्यापार चर्चेतील गती स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'करार योग्य दिशेने जात आहे आणि लवकरच पूर्ण होईल,' असे सांगितलं आहे.

India-US Trade Deal: भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार कधी अंतिम होणार? ट्रम्प टॅरिफबाबत मोठी अपडेट

India-US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला व्यापार करार आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अलीकडील वक्तव्यांमुळे व्यापार चर्चेतील गती स्पष्ट होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'करार योग्य दिशेने जात आहे आणि लवकरच पूर्ण होईल,' असे सांगत आशावाद व्यक्त केला आहे.

अमेरिकन शिष्टमंडळ 10 डिसेंबरला भारत दौऱ्यावर

भारत आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय चर्चा पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. या दौऱ्यात अमेरिका व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर आणि मुख्य वाटाघाटीकार ब्रँडन लिंच भारतामध्ये येऊन वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेतील. 10 ते 12 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर व्यापार करार अंतिम करण्याची शक्यता अधिक मानली जात आहे.

ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्काचा प्रश्नही चर्चेत

ऑगस्ट 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेल खरेदीवर 25 टक्के अतिरिक्त कर लादला होता. यामुळे एकूण कर 50 टक्क्यांपर्यंत गेला आणि याच कारणामुळे व्यापार करार अनेक महिन्यांपासून थांबला. त्यानंतरही दोन्ही देशांदरम्यान सातत्याने संवाद सुरू ठेवण्यात आला. 

हेही वाचा – India-Russia Relations: पुतिन यांच्या दौऱ्यानंतर लगेचचं रशियाने भारताला दिला मोठा धोका? चीनसोबत मिळून केलं 'हे' काम

दोन्ही देशांकडून सकारात्मक संकेत

अमेरिका आणि भारतातील वरिष्ठ नेत्यांनी व्यापार करार लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट केले आहे. तथापी, ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, भारतासोबत उत्तम करार लवकरच अंतिम होईल. तथापी, पियुष गोयल यांनी म्हटलं आहे की, व्यापार करारासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. तसेच  या वर्षाअखेरीस करार पूर्ण करून भारतीय निर्यातदारांच्या कर समस्या सुटतील, असं राजेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा –  Pakistani Woman Appeals to PM Modi: 'न्याय मिळाला नाही तर महिलांचा विश्वास उडेल'; पाकिस्तानी महिलेचे पंतप्रधान मोदींना भावनिक आवाहन

अमेरिका कर कमी करण्याची शक्यता

दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत एकूण 6 फेऱ्यांच्या चर्चा झाल्या आहेत. अंतिम निर्णय अद्याप न झालेला असला तरी ब्रोकरेज कंपन्या सकारात्मक अंदाज व्यक्त करत आहेत. नोमुरा या जागतिक कंपनीने म्हटले आहे की, भारतावरील अमेरिकी करांमध्ये कपात होऊ शकते. भारत-अमेरिका व्यापार करारावर गेल्या वर्षभरात अनेक चढ-उतार झाले. मात्र दोन्ही देशांच्या सक्रिय चर्चेमुळे आता करार अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट होत आहे. ट्रम्प प्रशासनाची शुल्कावरील भूमिका आणि आगामी शिष्टमंडळाची बैठक या प्रक्रियेला निर्णायक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number