First Bullet Train In India: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने देशवासीयांना दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणारी ही ट्रेन 15 ऑगस्ट 2027 रोजी रुळांवर धावणार आहे. बुलेट ट्रेनची घोषणा करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "तुमची बुलेट ट्रेनची तिकिटे आत्ताच खरेदी करा, कारण ट्रेन पुढच्या वर्षी येईल." सरकार निर्धारित वेळेत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यात सुरत बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाचा आढावा घेऊन अभियंत्यांशी संवाद साधला होता.
हेही वाचा – Bharat Taxi: खासगी वाहनांनी मनमानी संपणार; देशभरात 'भारत टॅक्सी' सेवा सुरू, किती भाडे आकारणार? जाणून घ्या
वंदे भारत स्लीपर ट्रेन सज्ज
बुलेट ट्रेनसोबतच रेल्वेमंत्र्यांनी 'वंदे भारत स्लीपर' ट्रेनबाबतही महत्त्वाची अपडेट दिली. या ट्रेनची सर्व चाचणी आणि प्रमाणन (Certification) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही ट्रेन गुवाहाटी ते कोलकाता मार्गावर धावणार आहे. या ट्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक सुरक्षितता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काही दिवसांत या पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी सुरत स्टेशनवरील कामाची बारकाईने पाहणी केली होती. हा प्रकल्प केवळ गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणारे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हाय-स्पीड रेल्वेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.