Rohini Acharya Slams Tejashwi Yadav: ‘किडनी दान करण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला’; रोहिणी आचार्य यांचा तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा

दरम्यान, X वर हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहिणी आचार्य यांनी लिहिले, &quotज्यांना लालूंच्या नावाने काहीतरी करायचे आहे त्यांनी खोटी सहानुभूती दाखवणे थांबवावे.

Rohini Acharya Slams Tejashwi Yadav: ‘किडनी दान करण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला’; रोहिणी आचार्य यांचा तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा

Rohini Acharya Slams Tejashwi Yadav: बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबातील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. यामध्ये आता लालू यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केलेल्या विधानामुळे नवीन वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर रोहिणी आचार्य यांचा एका पत्रकाराशी झालेल्या दूरध्वनी संभाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये रोहिणी भावनिक आवाजात सांगताना दिसतात की, “जेव्हा बाबांसाठी किडनी दान करण्याची वेळ आली, तेव्हा मुलगा पळून गेला.”

लोकांनी किडनी दान करण्यासाठी पुढे यावे – रोहिणी आचार्य

दरम्यान, X वर हा व्हिडिओ पोस्ट करताना रोहिणी आचार्य यांनी लिहिले, "ज्यांना लालूंच्या नावाने काहीतरी करायचे आहे त्यांनी खोटी सहानुभूती दाखवणे थांबवावे आणि त्याऐवजी लाखो गरीब लोकांना, ज्यांना किडनीची गरज आहे, जे रुग्णालयात शेवटचे श्वास घेत आहेत, त्यांच्या किडनी दान करण्यासाठी पुढे यावे आणि लालूंच्या नावाने त्यांचे किडनी दान करावी." विवाहित मुलीने तिच्या वडिलांना किडनी दान केल्याबद्दल दोष देणाऱ्यांनी तिच्याशी खुल्या व्यासपीठावर उघड चर्चा करण्याचे धाडस करायला हवे, रोहिणी यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा – Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट! मुंबईत तीन संशयित ताब्यात, गुप्त डिजिटल नेटवर्कचा शोध

तथापी, रोहिणी यांनी पुढे अशा लोकांवर निशाणा साधला ज्यांनी मुलगी वडिलांना किडनी देणे ‘चुकीचे’ असल्याचे सुचवले होते. रोहिणी यांनी म्हटलं आहे की, “ज्यांना मुलीची किडनी अशुद्ध वाटते त्यांनीच सर्वप्रथम हे महान दान करावे. हरियाणवी भक्त आणि ट्रोलर्स फक्त बोलतात. देणगी देण्याच्या वेळी रक्ताची बाटलीही देऊ शकत नाहीत.” दरम्यान, वडिलांच्या उपचारांसाठी रोहिणी यांनी किडनी दिल्यानंतर त्या देशभरात चर्चेत आल्या होत्या. परंतु आता रोहिणी यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. 

हेही वाचा – Delhi Bomb Threat : राजधानी अजूनही दहशतीत; दोन शाळा, चार न्यायालयं बॉम्बने उडवण्याची धमकी, 'जैश-ए-मोहम्मद'च्या अकाऊंटवरून मेल

तथापी, 16 नोव्हेंबर 2025 रोजी, रोहिणी यांनी एक्सवर एक भावनिक पोस्ट करत जाहीर केले की, ती राजकारणातून बाजूला होत असून कुटुंबाशी संबंधही तोडत आहे. या घोषणेनंतर लालू घराण्यातील तणाव आणखी प्रकर्षाने समोर आला. रोहिणी आचार्य भूतकाळात अनेकदा आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिल्या होत्या. तेज प्रताप यादव यांच्यासाठीही त्यांनी उघडपणे भूमिका घेतली होती. मात्र अलीकडच्या घडामोडींनी स्पष्ट केले आहे की, लालू कुटुंबातील अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number