PM Modi Rajya Sabha Speech: ‘तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही…’; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे जनतेला आश्वासन

युद्धाचे दुष्परिणाम दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात, मात्र भारत सरकार पूर्णपणे सतर्क आहे. तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही, असे आश्वासन मोदींनी यावेळी देशवासियांना दिले.

PM Modi Rajya Sabha Speech: ‘तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही…’; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे जनतेला आश्वासन

PM Modi Rajya Sabha Speech: मध्य-पूर्वेतील बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत देशाला संबोधित केले. “युद्धाचे दुष्परिणाम दीर्घकाळापर्यंत टिकू शकतात, मात्र भारत सरकार पूर्णपणे सतर्क आहे. तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी यावेळी देशवासियांना दिले. या संघर्षाचा भारताची ऊर्जा सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि परदेशातील भारतीयांवर होणाऱ्या परिणामांबाबत पंतप्रधानांनी सरकारची रणनीती स्पष्ट केली.

ऊर्जा सुरक्षा आणि ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ मधील संकट
पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा जगातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग सध्या संघर्षामुळे विस्कळीत झाला आहे. तेथून जहाजांचे मार्गक्रमण कठीण झाले असून, भारताचा तेल, वायू आणि खतांचा पुरवठा अखंडित राखणे हे सरकारपुढील मोठे आव्हान आहे. अनेक जहाजांवर भारतीय खलाशी अडकले असून त्यांची सुरक्षा ही चिंतेची बाब आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह सर्व प्रमुख देशांशी भारत सतत संपर्कात असून संवाद आणि मुत्सद्देगिरीने शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन
परिस्थिती दर मिनिटाला बदलत असल्याने प्रत्येक आव्हानासाठी भारतीयांनी सज्ज राहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “आपण संयम आणि शांत चित्ताने या संकटाचा सामना केला पाहिजे,” असे ते म्हणाले. पश्चिम आशियातील राष्ट्रप्रमुखांशी दोन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून शांततेचा एकजूट आवाज जगभर जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

आखाती देशांतील 1 कोटी भारतीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य
पश्चिम आशियातील युद्धाला आता 3 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. आखाती देशांमध्ये सुमारे 1 कोटी भारतीय नागरिक कार्यरत आहेत. त्यांच्या जीवाची आणि उपजीविकेची सुरक्षा ही सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे मोदींनी सांगितले. या युद्धामुळे व्यापार मार्ग विस्कळीत झाले असून त्याचा फटका पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या नियमित पुरवठ्याला बसत आहे.

हेही वाचा – Supreme Court : हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा होईल रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

इंधन साठा आणि राज्य सरकारांना सूचना
पंतप्रधानांनी देशाला खात्री दिली की, भारताकडे कच्च्या तेलाचा (Crude Oil) पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनासाठी केवळ एकाच स्रोतावर अवलंबून न राहता एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) वरही सरकार भर देत आहे. तसेच, स्थलांतरित कामगारांवर या संकटाचा मोठा परिणाम होत असल्याने राज्य सरकारांनी त्यांची विशेष काळजी घ्यावी आणि कल्याणकारी योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number